पिण्याचे पाणी नदी-नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:54 PM2018-05-04T22:54:34+5:302018-05-04T22:54:47+5:30
भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे दोन कोटीची पाणीपुरवठा योजना दहा ते बारा वर्षापासुन धुळखात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजना अंतर्गत ठाणा पेट्रोलपंप येथे दोन कोटीची पाणीपुरवठा योजना दहा ते बारा वर्षापासुन धुळखात आहे. मागील आठवड्यापासुन पाणी सुरु करण्यात आले. मात्र पिण्याचे पाणी नळाला न येता नदी नाल्यात जात आहे. याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
याबाबत असे की, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे यांच्या कार्यकाळातील १ कोटी ४६ लक्ष किमतीची महत्वाकांक्षी भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजना मंजुर झाली. ती सन २००७ मध्ये तिन कंत्राटदारानी ही योजनाचे बांधकाम केले. आजघडीला योजनेला दहा ते बारा वर्ष लोटले. मात्र नळधारकांच्या नळाला काही पाणी येत नाही. ही बाब हेरुन माजी सरपंच यांनी भंडारा पंचायत समिती आमसभेत प्रश्न उपस्थित केला. दोन महिन्यात अधिकारी व आमदाराकडून आश्वासन मिळाले. आज एक वर्ष लोटले. नविन ग्रामपंचायत कमेटी निर्माण झाली. त्यानुसार नविन पाणीपुरवठा समितीही तयार करण्यात आली. समितीचे कार्य कासवगतीने असल्याने गावांना यावर्षीही पिण्याचे मिळणार की नाही याची शास्वती कमीच आहे. याचे कारण दहा ते बारावर्षापासून मुख्य जलवाहिणी व वितरण नलिका प्लास्टीक व जमिनीतील आद्रता यांचा संयोजनाने पीव्हीसी पाईप लाईन ठिसूळ झालेली आहे.
पाण्याचा वाढता दाब यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे भगदाळ पडत आहे. परिणामी पिण्याचे पाणी हे नदी-नाल्यामये जात आहे. उदा. दयावयाचे झाल्यास शहापूर येथील सेलोकर राईस मिल व नुतन हार्डवेअर दरम्यान मुख्य जलवाहिणीला मोठा भगदाड पडले असून पिण्याचे पाणी हे सांड नाल्याद्वारे वैनगंगा नदीला जाऊन मिळत आहे. याबाबद मिल मालकाने संबंधित विभागाला कळविले असता, आम्ही दुरुस्त करत नाही या शब्दात प्रकरणाला बगल देण्यात येत आहे. याबाबत संबंधित वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.