वाहने सावकाश चालवा; मोकाट जनावरे वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:40 AM2021-09-23T04:40:31+5:302021-09-23T04:40:31+5:30
बॉक्स मोकाट जनावरांचा वाली कोण? भंडारा शहरातील काही पशुपालक हे फक्त गायींचे दूध काढण्यासाठी घरी नेतात. त्यानंतर सकाळी या ...
बॉक्स
मोकाट जनावरांचा वाली कोण?
भंडारा शहरातील काही पशुपालक हे फक्त गायींचे दूध काढण्यासाठी घरी नेतात. त्यानंतर सकाळी या मोकाट जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडून दिले जाते. मात्र त्यांना चारा दिला जात नाही. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होतो. नगरपरिषदेने कारवाई करण्याची गरज आहे.
बॉक्स
वर्षभरात एकही कारवाई नाही
भंडारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने शहराच्या प्रमुख मार्गांवर वाहनांची प्रचंड ये-जा सुरू असते. त्यातच मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून उभी असतात. मात्र नगर परिषदेकडून कोणतीच कारवाई होत नाही. याच संधीचा फायदा या जनावर मालक उचलत आहेत. या मुक्या प्राण्यांसाठी जनावर मालकांनी चाऱ्यापाण्याची सोय केल्यास ही जनावरे रस्त्यावर फिरणार नाहीत. भंडारा नगरपरिषदेने अशा जनावर मालकांचा शोध घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. मात्र एकही कारवाई होत नाही.
बॉक्स
या मार्गावर वाहने जपून चालवा...
बसस्थानक ते गांधी चौक
जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक
मुस्लीम लायब्ररी चौक ते त्रिमूर्ती चौक