चालक, वाहकांना झोपावे लागते कुठे मंदिरात तर कुठे एसटी बसमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:58+5:302021-03-16T04:34:58+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. मात्र अनेक प्रवाशांशी एसटी कर्मचाऱ्यांचा संपर्क येत ...

Drivers, carriers have to sleep somewhere in the temple and somewhere in the ST bus | चालक, वाहकांना झोपावे लागते कुठे मंदिरात तर कुठे एसटी बसमध्येच

चालक, वाहकांना झोपावे लागते कुठे मंदिरात तर कुठे एसटी बसमध्येच

Next

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. मात्र अनेक प्रवाशांशी एसटी कर्मचाऱ्यांचा संपर्क येत असल्याने कोरोनाची भीती गावकऱ्यांमध्ये असते. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळा अशा ठिकाणी चालक, वाहक यांच्या झोपण्याची व्यवस्था होत नाही. मात्र असे असले तरीही अजूनही माणुसकी शिल्लक असल्याचाही अनुभव येत आहे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे एसटीतच झोपावे लागत आहे. तर मुंढरी येथे चालक, वाहकांना मंदिरात झाेपावे लागते. एसटी बसमध्ये झोपताना या कर्मचाऱ्यांना डासांचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावचे सरपंच, पोलीस पाटलांनी या कर्मचाऱ्यांच्या झोपण्याची व इतर सुविधांसाठी मदत करण्याची गरज आहे.

बॉक्स

आंघोळीसह शौचालयाची अडचण

ग्रामीण भागात मुक्कामी बसफेऱ्या घेऊन जाणाऱ्या चालक,वाहकांना एसटीचा हक्काचा निवारा नसल्याने ग्रामपंचायतची मदत घ्यावी लागते. मात्र काही ग्रामपंचायतमध्ये सहकार्य मिळत नसल्याने एसटीच्या मुक्कामी चालक,वाहकांना शौचालय, आंघोळीसाठी अडचणी येतात. अशा वेळी दिवसभर वणवण केलेल्या कर्मचाऱ्यांना रात्रीही ताज्या जेवणासह, वैयक्तिक स्वच्छता व पुरेशी झोप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

बॉक्स

कोरोनामुळे मदतीसाठी गावकरीही पुढे येईनात...

कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. मात्र तरीही एसटीच्या बस सेवा सुरू आहेत. अशा वेळी चालक,वाहक यांचा प्रवाशांची अनेकदा संपर्क येतो. त्यामुळे पूर्वी रात्री गावात मुक्कामी बस असलेल्या ठिकाणी नागरिकांची एसटीच्या कर्मचाऱ्यांना मदत मिळायची मात्र आता कोरोनानंतर हे चित्र बदलले आहे. पूर्वी मदतच नाही तर जेवण, चहापाणी याव्यतिरिक्त आंघोळ, स्वच्छतेसाठी मदत हवी असली तरीही लोक करायचे मात्र आज हे चित्र दिसत नाही. यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील यांनी या एसटीच्या चालक, वाहकांना मदत करून खऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याची गरज आहे.

बॉक्स

जुन्या बसमध्ये झोपण्याची सोय होती

पूर्वीच्या गाड्यांमध्ये झोपता येत होते. तशा सीट होत्या, मात्र आताच्या नवीन गाड्यांमध्ये तशा सीट नसल्याने झोपता येत नाही. अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे चालक,वाहकांना मुक्कामी ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी एसटी महामंडळ व ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार हवा. दिवसभर वाहन चालवून थकलेल्या एसटीच्या चालक-वाहकांना किमान शक्य तितका मदतीचा हात देण्याची जबाबदारी ही ग्रामीण स्तरावरील सरपंच, उपसरपंच पोलीस पाटलांची आहे. त्यासाठी माणुसकीच्या नात्याने अनेक गावात पुढाकार घेण्याची गरज आहे. जुन्या बसमध्ये झोपण्याची सोय होती

पूर्वीच्या गाड्यांमध्ये झोपता येत होते. तशा सीट होत्या, मात्र आताच्या नवीन गाड्यांमध्ये तशा सीट नसल्याने झोपता येत नाही. अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे चालक,वाहकांना मुक्कामी ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागतो. यासाठी एसटी महामंडळ व ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार हवा. दिवसभर वाहन चालवून थकलेल्या एसटीचा चालक,वाहकांना किमान शक्य तितका मदतीचा हात देण्याची जबाबदारी ही ग्रामीण स्तरावरील सरपंच, उपसरपंच पोलीस पाटलांची आहे. त्यासाठी माणुसकीच्या नात्याने अनेक गावात पुढाकार घेण्याची गरज आहे.

कोट

मुक्कामी बस फेऱ्या असलेल्या मुंढरी येथे मंदिरातच झोपावे लागते. इतर गोष्टीसाठी गावकऱ्यांची मदत घ्यावी लागते. आम्हाला किमान झोपण्यासाठी, आंघोळीसाठी तरी हक्काचा निवारा हवा. यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकाराची गरज आहे.

संजय सपाटे, एसटी चालक,भंडारा.

कोट

कांद्री येथे तर आम्हाला बसमध्येच झोपावे लागते. कसेतरी एका हॉटेल मालकाच्या सहकार्याने आंघोळ, स्वच्छतेसाठी त्यांची मदत होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन एसटीच्या चालक, वाहक यांचेसाठी मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून प्रवाशांसाठी कर्तव्य निभावतो.

चंदेश्वर चामलाटे, चालक ,भंडारा.

कोट

भंडारा विभागात ७९ ठिकाणी मुक्कामी चालक वाहकांसाठी एसटीच्या स्वतःच्या इमारती आहेत. मात्र ग्रामीण ठिकाणी चालक व वाहकांना सरपंच, गावचे पोलीस पाटलांकडून ग्रामपंचायतमध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात येते. मात्र तरीही काही ठिकाणी अपवाद असल्यास आगार व्यवस्थापकांकडून तत्काळ दखल घेऊन कोणतीही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.

डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.

Web Title: Drivers, carriers have to sleep somewhere in the temple and somewhere in the ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.