बसेस चालतात चालकांच्या मर्जीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:56 PM2019-04-14T22:56:16+5:302019-04-14T22:56:35+5:30

प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस या चालकांच्या मर्जीनेच चालत असून याचा नाहक तास विद्यार्थी व दररोज नोकरीनिमित्त येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Drivers wish to operate buses | बसेस चालतात चालकांच्या मर्जीने

बसेस चालतात चालकांच्या मर्जीने

Next
ठळक मुद्देप्रवाशांना मनस्ताप : राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस या चालकांच्या मर्जीनेच चालत असून याचा नाहक तास विद्यार्थी व दररोज नोकरीनिमित्त येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिल्हा परिषद चौकात प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना देखील सलग तीन तीन बसेस हात दाखवूनही थांबत नसल्याने चालकांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील धावणाºया शिवशाही बसेसबद्दलही प्रवाशांची व दुचाकीचालकांची ओरड कायम आहे. शिवशाही बसेसचे चालक हे कंत्राटी पद्धतीने कंपनीकडून भरलेले असल्याने यावर महामंडळाचा अंकुश नाही. तसेच भंडारा ते नागपूर काहीच थांबे असल्याने या बसेस अतिवेगाने धावत असतात. समोरून येणाºया दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. याबद्दल भंडारा आगार प्रमुखांना काही दुचाकी चालकांना भेटून झालेल्या घटनांबद्दल सांगितले असताना देखील याबाबत कोणतीही लेखी तक्रार चालकांना देण्यात आलेली नाही. अती वेगाने धावणाºया या चालकांवर महामंडळाने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून बसेसमध्ये जागा नसल्याचे कारण दाखवून अनेक बस हात दाखवूनही थांबत नाहीत.
प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून अनेकदा प्रयत्न केले जातात. परंतु जिल्ह्यात चालक वाहकांच्या प्रवाशांसोबतच्या तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कधी विद्यार्थी तर कधी आबालवृद्ध महिला यांच्याशी हुज्जतबाजीचे प्रकार वाढले आहेत. यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे. अनेकदा सुट्या पैशांवरून प्रवाशांना अरेरावीने बोलणे तसेच बसस्थानकाच्या आधीच उतरविणे असे प्रकार घडले असताना देखील वाहकांवर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही. त्याबद्दल प्रवाशांमध्ये महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र संताप दिसून येत आहे.
नियमीत प्रवाशांसाठी हव्या नियमित बसेस
संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेत भंडारा ते नागपूर धावणाºया बसेसची संख्या जास्त असली तरी अनेक लांब पल्ल्याच्या बस थांबविल्या जात नाही. त्यामुळे शहरात येणाºया विद्यार्थी तसेच नौकरदार वर्गाला नेहमीच घरी पोहचायला उशिर होतो. त्यामुळे आगार प्रमुखांनी या समस्येकडे लक्ष देऊन चालक वाहकांना सूचना देऊन दखल घेण्याची गरज आहे. तरच एसटीच्या प्रवाशी संख्येत वाढ होईल.

Web Title: Drivers wish to operate buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.