गूळ निर्मितीतून ग्रामीण अर्थकारणाला चालना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:44+5:302021-02-12T04:33:44+5:30
तुमसर : बावनथडी आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात गत २०० वर्षांपासून गुऱ्हाळात गूळ निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च प्रतीच्या या ...
तुमसर : बावनथडी आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात गत २०० वर्षांपासून गुऱ्हाळात गूळ निर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. उच्च प्रतीच्या या गुळाला देशभरात मोठी मागणी आहे. यंदा कोरोना संकटात या गुऱ्हाळाने ग्रामीण अर्थकारणाला चालना दिली. अनेक शेतकरी या गूळ निर्मितीच्या व्यवसायातून प्रगतीची वाट शोधत आहेत.
नाकाडोंगरी आणि आष्टी परिसरात बावनथडी नदी वाहते. सुपीक शेतात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली जाते. परंतु परिसरात उसासाठी बाजारपेठच नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ सुरू केले. उच्च प्रतीच्या गुळाची निर्मिती सुरू झाली. सुरुवातीला स्थानिक बाजारात गुळाची विक्री केली जात होती. परंतु उच्च प्रतीच्या या गुळाला देशातील विविध भागात मागणी येऊ लागली.
शेतकरी आजही परंपरागत पद्धतीने गुळाची निर्मिती करतात. यात नफा कमी मिळतो. शासनाने आधुनिक यंत्र उपलब्ध करून दिली तर गूळ निर्मिती उद्योगाला मोठी चालना मिळू शकते.