धुळीच्या लोटाने आजार बळावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:57 PM2019-03-28T21:57:42+5:302019-03-28T21:57:54+5:30

शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे.

Drought has caused sickness | धुळीच्या लोटाने आजार बळावले

धुळीच्या लोटाने आजार बळावले

Next
ठळक मुद्देसावधान! काम सुरु आहे : एकेरी वाहतूक ठरत आहे त्रासदायक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंत गत कित्येक दिवसांपासून सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गाचे रस्ता रूंदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसापासून वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे. रस्ता बांधाकामाचा फटका शहरवासीयांना बसत असून त्यांच्या आरोग्यासाठी मारक ठरत आहे.
दररोज सकाळी, संध्याकाळी ६ वाजतानंतर रस्त्यावर वाहनांची दररोज कोंढी होते. कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजात शहरवासीयांना दररोज ये-जा करताना प्रवाशांना धुळीमुळे नाकीनऊ येत आहे. रस्त्यावरून एस. टी, ट्रक यासारखी अवजड वाहने गेली केली की, वाहनामागून प्रचंड धुळीचे लोळ उडत असल्याने ही धुळ नागरिकांच्या नाका-तोंडात जात आहे. दुचाकी चालकांना तर वाहन चालविणेही धोकादायक ठरत आहे.
वाहन धारकांना रस्त्यावरून ये-जा करणे दिवसेंदिवस त्रासदायक होत असून चौकात खोदलेल्या खड्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाला अंदाजच येत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.एकाच वेळी दोन दोन वाहने जाण्याइतपत रस्ता रुंद नसल्याने वाहनधारकांकडून धोकादायक पद्धतीने वाहने चालवली जात आहेत. त्यामुळे अपघात झाल्यास अपघाताला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. राजीव गांधी चौक ते खात रोड या रस्त्याचीही हीच अवस्था असल्याने या रस्त्यावरील वाहतूकही जीवघेणी ठरते आहे. प्रशासनाकडून रस्ते कामाला उशिर होत असल्याने शहरवासीयांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. एकाच वेळी अनेक वाहने रस्त्यावरून ये-जा करणे शक्य होत नसल्याने यापुर्वीही रस्त्यावर अनेकदा अपघात झाले आहे. याच भागात अनेक दवाखाने, शाळा, महत्वाचे कार्यालये आहेत, हे मात्र विशेष.
पाणीटंचाईचा परिणाम
सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असताना या भागात धुळीचा त्रास होवू नये म्हणून नागरिकांकडून सकाळी, संध्याकाळी रस्त्यावर पाणी मारण्याची मागणी होत असतानाही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच पायी चालणाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे विद्यार्थी, आबालवृद्ध व रस्त्यावरून चालणाºया पादचाऱ्यांना धुळीमुळे चालणे असह्य होत आहे.

Web Title: Drought has caused sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.