गुरठा परिसरात दुबार पेरणीचे संकट

By admin | Published: June 24, 2016 01:14 AM2016-06-24T01:14:44+5:302016-06-24T01:14:44+5:30

यंदा भरपूर पाऊस येणार. जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर असणार, सरासरी १०० टक्के च्या पुढे पाऊस बरसणार, अंदमान निकोबार, केरळ,

Drought sowing crisis in Gurda area | गुरठा परिसरात दुबार पेरणीचे संकट

गुरठा परिसरात दुबार पेरणीचे संकट

Next

पालांदूर : यंदा भरपूर पाऊस येणार. जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर असणार, सरासरी १०० टक्के च्या पुढे पाऊस बरसणार, अंदमान निकोबार, केरळ, कोकण या ठिकाणी मान्सून अगोदरच आला वैगेरे सारखे वार्ता हवामान खात्याने पुरविल्याने शेतकरी आश्वासीत होत पेरणीकडे वळला.
मृगाच्या आरंभाला पेरणी केली अन् पाऊस सुटीवर गेला. एक - दोन सरी बरसल्याने आतील दाणा अंकुरला व सुकला तर वरचा दाणा पाखरांनी पोटभरणी केला. यामुळे मृगातली पेरणी वाया गेली. तेव्हा कृषीविभागाने सर्वे करून दुबार पेरणीचे सल्ले व बियाणे मोफत किंवा अनुदानावर पुरविण्याची मागणी गुरठ्याचे प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच माणिक हुमे यांनी केली आहे. हवामान खाते अंदाज व्यक्त करतात. त्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन केले जाते. मात्र आपले हवामान खाते नेहमीच टिकेला पात्र ठरत आहे. सॅटेलाईट च्या दुनियेत आपण कुठे कमी पडतो, कोणते तांत्रिक साहित्य आपल्याला पुरविण्यात शासन कमी पडतो. याचा दीर्घ अभ्यास होणे काळाची गरज वाटते. पाऊस येणार म्हटले तर उन पडते व उन पडणार म्हटले तर पाऊस पडते. असे बऱ्याचदा अनुभवास पडते. अचूक हवामान अंदाजाकरिता अत्याधुनिक साधनांची गरज हवामान खात् याला मिळणे आवश्यक वाटते.
गुरठा परिसरातील १०-१५ गावात पेरणीचे प्रमाण ६० टक्के च्या पुढे गेले आहे. यात आवत्याचे प्रमाण नगण्य असून नर्सरी (पऱ्हे)ची पेरणी अधिक प्रमाणात केली आहे. कृषी केंद्रातूनच बियाणे खरेदी करून पेरणी आटोपली आहे. गुरठ्याजवळील कनेरी येथील सिंचीत शेतकऱ्याचे बियाणे पाणी देऊनही अंकुरले नसल्याने पुन्हा एकदा बि पुरवठा करणारी कंपनी वादाच्या भोवऱ्यात अडकणार आहे. मागील ३ वर्षाचा दुष्काळ डोक्यावर असताना याही वर्षी निसर्गाची हुलकावणी शिरजोर होत असल्याने शेतकरी खचत आहे. पिककर्ज वाढत आहे. दैनंदिन खर्च महागाईने झेपावणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Drought sowing crisis in Gurda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.