१५ हजाराची लाच घेणे भोवले, औषधी निरीक्षक प्रशांत रामटेके गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:58 PM2023-06-14T12:58:28+5:302023-06-14T13:00:04+5:30

तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर रात्रीच सापळा रचण्यात आला

Drug inspector of food and drug supply department of Bhandara arrested for accepting bribe of 15 thousand | १५ हजाराची लाच घेणे भोवले, औषधी निरीक्षक प्रशांत रामटेके गजाआड

१५ हजाराची लाच घेणे भोवले, औषधी निरीक्षक प्रशांत रामटेके गजाआड

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : शहरातील कीर्ती मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल मध्ये औषध दुकान सुरु करण्याचा परवाना मंजूर केल्याने मोबदला म्हणून  १५ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या भंडारा शहरातील अन्न व औषध पुरवठा विभागातील औषध निरीक्षक प्रशांत रामटेके (४६) याला गजाआड व्हावे लागले. ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा पार पडली. 

तक्रारदार डॉक्टर असून आपल्या भावसुनेच्या नावाने शहरातील एका मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटलमध्ये औषधीचे दुकान (फार्मसी) सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे त्यांनी अर्ज दिला होता. फार्मसीच्या त्या परवान्याच्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या त्रुट्या न काढल्यामुळे परवाना मंजूर झाला. त्यामुळे मोबदला म्हणून २० हजार रुपये द्यावे, अशी मागणी प्रशांत रामटेके याने केली. यावर तडजोड करून १५ हजार रुपयात हे प्रकरण ठरले. स्वत: आपण कीर्ती मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटलच्या कॉम्लेक्समध्ये येऊन रक्कम घेऊ असे रामटेकेने सांगितले.

यासंदर्भात तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर रात्रीच सापळा रचण्यात आला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास रामटेके याने हॉस्पिटलच्या कॉम्लेक्समध्ये येऊन १५ हजार रुपयांची रक्कम स्विकारून खिशात टाकताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या शिपायांनी त्याला रकमेसह अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरा भंडारा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर आणि पोलीस उपअधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार यांच्या मागर्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमित डहारे आणि पथकाने पार पाडली.

Web Title: Drug inspector of food and drug supply department of Bhandara arrested for accepting bribe of 15 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.