किराणा दुकानातून औषधसाठा जप्त
By Admin | Published: December 20, 2014 10:33 PM2014-12-20T22:33:50+5:302014-12-20T22:33:50+5:30
किराणा दुकानात विनापरवाना औषधी ठेवून ती विकल्या जात होती. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा घातला. ही कारवाई तुमसर येथील मे. गुप्ता किराणा स्टोर्स येथे घालून
भंडारा : किराणा दुकानात विनापरवाना औषधी ठेवून ती विकल्या जात होती. या माहितीवरून अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी छापा घातला. ही कारवाई तुमसर येथील मे. गुप्ता किराणा स्टोर्स येथे घालून किराणा व्यवसायीकावर कारवाई केली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे नियम बाजूला सारून विनापरवाना औषधांची विक्री करण्यात येते. जिल्ह्यातील विविध ठिकाणी किराणा व्यवसायीक अवैधरित्या औषधसाठा ठेवून ग्राहकांना विकतात. मागील अनेक दिवसांपासून असा गोरखधंदा जिल्ह्यात सुरु आहे. या माहितीवरून अन्न व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त दा.रा. गहाणे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक मोनिका मोहोड, उमेश घरोटे यांनी तुमसर येथील तहसील रोडवरील प्रमोदकुमार रामकिशोर गुप्ता यांच्या किराणा दुकानात सापळा रचला.
किराणा दुकानातून होत असलेल्या औषध विक्रीच्या अनुषंगाने औषध प्रशासन विभागाने दुकानदाराने बोगस ग्राहक पाठविला. यावेळी दुकानदाराने त्याला विनापरवाना विक्री करीत असलेल्या औषधी साठ्यांपैकी औषध विकली. यानंतर सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा घालून दुकानदार गुप्ता यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत औषध प्रशासनाने किराणा दुकानातून पॅरासिटामल, आय बू प्रोफेल, निमूसुलाईट या ताप व दुखण्यावरील औषधांचा साठा मिळाला. यावरून अन्न व औषध प्रशासनाने केशव गुप्ता व प्रमोद गुप्ता यांच्यावर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याच्या कलम १८ (क) च्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला. या कारवाईने अवैधरित्या औषधांचा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. (शहर प्रतिनिधी)