दारूच्या नशेत शिवीगाळ करणे जीवावर बेतले; गळा चिरून शेजाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 11:34 AM2021-10-28T11:34:43+5:302021-10-28T16:17:31+5:30

दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करून कारची तोडफोड केल्याच्या रागातून शेजाऱ्याचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोहाडी येथील गांधी वाॅर्ड परिसरात घडली.

drunken man murdered over a small fight bhandara | दारूच्या नशेत शिवीगाळ करणे जीवावर बेतले; गळा चिरून शेजाऱ्याचा खून

दारूच्या नशेत शिवीगाळ करणे जीवावर बेतले; गळा चिरून शेजाऱ्याचा खून

Next
ठळक मुद्देआरोपी अटकेत

भंडारा : दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करून कारची तोडफोड केल्याने राग अनावर झालेल्या एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या इसमाचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोहाडीतील गांधी वार्डात बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. खुनानंतर तरुणाने थेट मोहाडी पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले.

गंगाधर उर्फ बंग्या निमजे (५०) रा. गांधी वाॅर्ड मोहाडी असे मृताचे नाव असून आकाश श्रीपाद (२२) असे आरोपीचे नाव आहे. मोहाडी येथील गांधी वार्डात मृतक व आरोपी यांचे घर थोड्या थोड्या अंतरावर आहेत. घटनेच्या दिवशी गंगाधर हा दारुच्या नशेत तुल होता. त्याने आरोपी आकाशच्या आईला काही कारणावरुन शिवीगाळ करत कारची तोडफोड केली.

आकाशने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंगाधर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे आकाशचा राग अनावर झाला आणि त्याने सायकलचा काटेरी गियर गंगाधरच्या गळ्यावर मारला. त्यात गळा चिरला जावून अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने गंगाधरचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार माहीत होताच परिसरातील नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली. गंगाधर हा धिप्पाड शरीरयष्टीचा, तर आकाश सडपातळ बांध्याचा आहे. त्यामुळे हा खून झाल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. आकाशने घटनेनंतर स्वतःच पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीसुद्धा याच परिसरात एकाची हत्या झाली होती. या भागात गुन्हेगारांची संख्या वाढल्याची तक्रार आहे, त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: drunken man murdered over a small fight bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.