जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:19 PM2017-08-27T22:19:33+5:302017-08-27T22:19:59+5:30

जिल्ह्यात वरुणराजा रुसल्याने अल्पपावसाने रोवणी खोळंबली आहे.

The dry draft passed by the District Bank | जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

जिल्हा बँकेने पारित केला कोरड्या दुष्काळाचा ठराव

Next
ठळक मुद्देजिल्हा बँकेची वार्षिक सभा : २५१.८७ कोटींचे पीककर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात वरुणराजा रुसल्याने अल्पपावसाने रोवणी खोळंबली आहे. वेळेत पाऊस न बरसल्याने पºहे पिवळे पडली असून जिल्ह्याला कोरडा दुष्काळ जाहीर करावा असा ठराव जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी बँकेच्या १४ व्या वार्षिक आमसभेत शेतकºयांच्यावतीने ठराव मांडला. हा ठराव सर्वसंमतीने पारितही करण्यात आला.
यावेळी मंचावर आ. चरण वाघमारे, माजीमंत्री नाना पंचबुध्दे, संचालकात कैलाश नशिने, अशोक मोहरकर, रामलाल चौधरी, कवलसिंग चढ्ढा, नरेंद्र बुरडे, विलास वाघाये, होमराज कापगते, सत्यवान हुकरे, प्रेमसागर गणवीर, सदाशिव वलथरे, वासुदेव तिरमारे, डॉ. श्रीकांत वैरागडे, रामदयाल पारधी, रामराव कारेमोरे, दामाजी खंडाईत सर्व सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी, बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे हजर होते. बँकेच्या वतीने मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वप्रथम दिवंगताना श्रध्दांजली वाहण्यात आली.
सुनिल फुंडे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केलीच आहे तर तिला अटी/शर्तीच्या बंधनातून मुक्त करीत सरसकट कर्जमाफी करावी असाही ठराव सभेत ठेवण्यात आला.
पिकविमा ऐच्छिक ऐवजी बंधनकारक करण्यात आला असून पंतप्रधान विकविमा योजनेत धान व सोयाबिनसोबत जिल्ह्यात होत असलेल्या तुर, ऊस, हळद, मिरची, भाजीपाला याही पिकांचा समावेश करण्यात यावा, यावर्षी पिकविमा भंडारा जिल्ह्याला ओरीएंटल इन्शूरन्स कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने आपले कार्यक्षेत्र वाढवित विमा अनुषंगाने, शेतकºयांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. संस्थेच्या मालकांनी अर्थात अध्यक्ष व संचालकांनी संस्थेच्या नियमित कारभारात जातीने लक्ष पुरवावे. सेवा सहकारी संस्थेत स्वत:च्या अधिकारात राहून बैद्यनाथन समितीचे आधाराने सचिव नेमावा. संस्थेंतर्गत धान खरेदी, खत औषधी विक्री करावी, असेही ते म्हणाले.
काही दिवसात मायक्रोएटीएमची सेवा सर्व शाखेला कार्यान्वित केली जाईल. शेतकºयांना थेट पिकविम्याची सोय केली आहे. कर्ज पुरवठ्याकरिता बँक प्रयत्नशिल आहे. शेतकºयांच्या कर्जाची पूर्ण माहिती बँकेत जमा आहे. तेव्हा आॅनलाईन कर्जमाफी बंद करुन बँकेच्या आधाराने देण्यात यावी बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत असून लेखापरिक्षणास अ वर्ग मिळाला आहे. बँक नफयात असून एनपीए ५ टक्क्यावर असल्याने लाभांश वाटता येत नाही. त्यामुळे भेटवस्तू वाटपाचा विचार आहे. चालू वर्षात शेतकºयांना २५१.८७ कोटीचे कर्जवाटप केल्याची माहितीही फुंडे यांनी दिली. बँकेच्या कर्मचाºयांनी वेळेत पगार तारणाची रक्कम भरावी, २००९ ते २०१७ पर्यंतचे सरसकट कर्ज माफ करावे. गोदाम बांधकामाकरिता नाबार्डच्या धोरणानुसार कर्जपुरवठा करण्याचा मानस आहे. मागील वर्षीच्या सभेचे कार्यवृत वाचून कायम करण्यात आले. जेष्ठ नेते दामाजी खंडाईत यांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देवून इतरांनाही त्यांची माहिती देण्यात आली. प्रस्तावना सुनिल फुंडे यांनी केली.
आमदार चरण वाघमारे म्हणाले, शेतकºयांप्रती मी जागृत असून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली असून जिल्ह्यात ४२ हजार शेतकरी शंभर टक्के कर्जमाफीस पात्र आहेत. ५३ हजार शेतकरी २५ टक्के कर्जमाफीत तर ६० हजार शेतकºयांनी कर्ज घेतलेले नाही. ३१ जुलैपर्यंत ज्यांचे रोवणे झाले नाहीत त्यांना २५ टक्के पिकविमा हक्क मिळणार आहे. धान कापणीत कळपा भिजल्या तरीसुध्दा पिकविमा मिळणार असून स्वत:च्या सातबाºयावर व्यापाºयाचे धान विकू देऊ नका. आॅनलाईन कर्जमाफी ही पारदर्शक आहे.

Web Title: The dry draft passed by the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.