वाळलेली झाडे ठरताहेत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 09:36 PM2019-03-15T21:36:44+5:302019-03-15T21:37:03+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील झाडांची पाहणी केली जाते. वाळलेल्या झाडे विकून त्या जागी नवी झाडे लावली जातात. परंतु जीर्ण झालेली झाडे केव्हा कोसळतील याचा नेम नाही. चार वर्षापुर्वी वरठी मार्गावरील कोथुर्णा फाट्यावर आटोवर विशालकाय वृक्ष कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासूनही प्रशासनाने आजपर्यत कुठलाही बोध घेतलेला दिसून येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यावरील झाडांची पाहणी केली जाते. वाळलेल्या झाडे विकून त्या जागी नवी झाडे लावली जातात. परंतु जीर्ण झालेली झाडे केव्हा कोसळतील याचा नेम नाही. चार वर्षापुर्वी वरठी मार्गावरील कोथुर्णा फाट्यावर आटोवर विशालकाय वृक्ष कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेपासूनही प्रशासनाने आजपर्यत कुठलाही बोध घेतलेला दिसून येत नाही.
राष्ट्रीय महामार्गावर असलेली काही वृक्ष पूर्णत: वाळले असून त्याचा बुंधाही सडत आहे. जिल्ह्याला गावांना तसेच विभागाला एकमेकांशी जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत रस्ते बांधण्यात आली. सदर रस्ते बांधताना रस्त्याच्या दुतर्फा झाडेही लावण्यात आली. परंतु यातील बरीच झाडे वाळून पडण्याच्या मार्गावर आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यातील अनेक मार्गावर बरीच झाडे वाळलेली आहेत. यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर काही रस्ते विकास महामंडळाकडे आहे. संबंधित विभागामार्फत रस्ते बांधताना मोठ्या प्रमाणात झाडे लावली. परंतु यातील अनेक झाडे आज वाळली असून ती पडण्याच्या मार्गावर आहे. बरीच झाडे ही महामार्गाच्या खूपच जवळ आहेत. झाडांचा बुंधा सडत चालल्याने अशी झाडे धोक्याची आहेत. त्यामुळे ती वेळीच तोडून टाकणे गरजेचे आहे.