महाराष्ट्र एक्सप्रेसमधील दुधव्यावसायिकांचा ‘डबा’ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:12 PM2017-11-06T23:12:09+5:302017-11-06T23:12:32+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाºया महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुग्ध व्यावसायिकांसाठी तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी २००५ मध्ये स्वतंत्र डबा सुरू केला होता. १२ वर्षानंतर दोन दिवसापूर्वी हा डबा बंद करण्यात आला आहे. यामुळे भंडारा-गोंदियातील नागपूरला दुध विकणाºया शेतकºयांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी माजी खासदार शिशुपाल पटले यांना दुधउत्पादक शेतकºयांनी मागणीचे देऊन रेल्वेचा तो 'डबा' पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात. नागपूरच्या बाजारपेठेत दुधाला चांगला भाव मिळतो, म्हणून गोंदिया ते नागपूर या रेल्वेमार्गावरील अंदाजे ५०० तरूण शेतकरी दररोज दुधाचा व्यवसाय करतात. कमीत कमी वेळात व कमी खर्चात नागपूरला दूध नेता यावे, दूध खराब होवून शेतकºयांचे नुकसान होवू नये, दुधाला अधिक भाव मिळावा, यासाठी शेतकºयांच्या मागणीवरून तत्कालीन खासदार शिशुपाल पटले यांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुध उत्पादक शेतकºयांसाठी स्वतंत्र डबा रेल्वे मंत्रालयातून मंजूर करवून घेतला होता.
गोंदिया, तिरोडा,तुमसर, भंडारा येथील शेकडो शेतकरी याच रेल्वे डब्यातून नागपूरला दुध नेत असत. मात्र कोणतीही सूचना न देता दोन दिवसांपूर्वी हा स्वतंत्र डबा बंद करण्यात आला आहे. शेतकºयांना रेल्वेतून दूध नेण्यास मज्जाव घालण्यात आल्याने या शेतकºयांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
स्थानिक बाजारपेठेत दुधाचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे अपेक्षित भाव मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये स्वतंत्र डबा देऊन पुन्हा दुध वाहतुकीची परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा आशयाचे निवेदन माजी खासदार शिशुपाल पटले यांना देण्यात आले.
यावेळी लतेश सेलोकर, भावलाल बांडेबुचे, संतोष वहिले, बारस्कर, सखाराम खवास, दिलीप सेलोकर,दिनेश सेलोकर, देवराम सेलोकर, पवन गलबले, धनपाल बारस्कर, सुनिल धार्मिक आदी शेतकरी उपस्थित होते.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरूण शेतकरी रेल्वेतून दुध वाहतूक करून नागपूरला विकत असतात. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना अनेकदा अपमानास्पद वागणूक मिळायची. हे चित्र पाहिल्यानंतर २००५ मध्ये या भागाचा खासदार या नात्याने शेतकºयांची अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये दुध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा लावून घेतला होता. तब्बल १२ वर्षानंतर कोणतीही सूचना न देता डबा बंद करण्यात आला. हा अन्याय असून यासंदर्भात सर्वप्रथम रेल्वेमंत्र्यांसोबत चर्चा करून यावर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न करणार आहे. यश आले नाही तर शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्यावर उतरूण संघर्ष करायची तयारी आहे.
शिशुपाल पटले, माजी खासदार