'तो' डबा महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:30 PM2017-11-11T23:30:04+5:302017-11-11T23:30:32+5:30

महिनाभरापासून दूध उत्पादकावर होणार अन्याय अखेर शुक्रवारपासून दूर झाला. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडणी करण्यात आल्याने ......

The 'duck' dhaba is undone by Maharashtra Express | 'तो' डबा महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत

'तो' डबा महाराष्ट्र एक्स्प्रेसला पूर्ववत

Next
ठळक मुद्देदूध उत्पादकांमध्ये आनंद : शिशुपाल पटले यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महिनाभरापासून दूध उत्पादकावर होणार अन्याय अखेर शुक्रवारपासून दूर झाला. रेल्वे विभागाकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसला दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा (बोगी) पूर्ववत जोडणी करण्यात आल्याने दुग्ध उत्पादकांमध्ये आंनद व्यक्त केला जात आहे.
भंडारा आणि गोंदिया या दूध उत्पादक जिल्ह्यांतील किमान ५०० दूध उत्पादक शेतकरी दररोज सकाळी नागपूरला दूध वाहतूक करण्याकरिता महाराष्ट्र एक्स्प्रेस चा उपयोग करतात. नागपूरला मागणी आणि दर जास्त असल्याने शेतकरी वर्गाकरिता हा जोडधंदा ठरत आला आहे. त्यांना रेल्वे वाहतुकी दरम्यान वाईट वागणूक आणि आर्थिक पिळवणुकीचा सामना करावा लागत होता. त्याकरिता तत्कालीन लोकसभा सदस्य शिशुपाल पटले यांनी १२ वर्षांपूर्वी रेल्वे मंत्री आणि उच्च अधिकारी यांचेशी सतत पाठपुरावा करून दूध उत्पादक शेतकरी यांना या मूलभूत समस्येवर मोठा दिलासा मिळवून दिला होता. त्यांच्याच प्रयत्नांनी महाराष्ट्र एक्सप्रेसमधून खास दुग्ध परिवहनाकरिता विशेष डबा मिळाला होता. शिवाय, आर्थिक पिळवणूक आणि अन्यायाची वागणूक देखील बंद झाली होती. मात्र, २००५ पासून सुरु असलेला विशेष डबा अचानक महिन्याभरापासून कुठलीही पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आला. इतकेच नव्हे तर दुग्ध परिवहनाला मज्जाव करण्यात आला. त्यामुळे भंडारा, तुमसर, तिरोडा, गोंदिया येथील दूध उत्पादक क्षेत्राला फटका बसला. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला.
याविरोधात, दूध उत्पादक किसान संघटनेकडून माजी खासदार शिशुपाल पटले यांना भेटून निवेदन देण्यात आले. त्यावर पटले यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच न्याय न मिळाल्यास पटले यांनी दूध उत्पादक शेतकºयांसोबत आंदोलनाची तयारी दर्शवली होती. त्यानुसार, त्यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री गोयल यांना भेटून आणि मुंबई येथे उच्च अधिकाºयांना भेटून तात्काळ अन्याय दूर करण्यात यश मिळवले.

Web Title: The 'duck' dhaba is undone by Maharashtra Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.