इसमाच्या सतर्कतेमुळे भामट्यांचा डाव फसला

By Admin | Published: July 31, 2015 12:59 AM2015-07-31T00:59:36+5:302015-07-31T00:59:36+5:30

बँकेबाहरे मोटारसायकल ठेवून खात्यातून रक्कम काढण्याकरिता एक इसम बँकेत गेले. चार भामट्यांनी मोटारसायकलचा प्लग काढून ठेवला.

Due to the alertness of the chest, | इसमाच्या सतर्कतेमुळे भामट्यांचा डाव फसला

इसमाच्या सतर्कतेमुळे भामट्यांचा डाव फसला

googlenewsNext

तुमसर : बँकेबाहरे मोटारसायकल ठेवून खात्यातून रक्कम काढण्याकरिता एक इसम बँकेत गेले. चार भामट्यांनी मोटारसायकलचा प्लग काढून ठेवला. इसम मोटारसायकल सुरू करण्याच्या प्रयत्नात त्याला लुबाडण्याचा कट भामट्यांनी रचला होता. इसम तथा उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेने त्या भामट्यांचा प्रयत्न फसला. या भामट्यांचा सध्या तुमसर पोलीस शोध घेत आहे. ही घटना गुरूवारी दुपारी २ वाजता शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर घडली.
राजेश नंदलाल उपरीकर रा. शिवाजीनगर तुमसर मजुरांची मजूरी देण्याकरिता शहरातील भारतीय स्टेट बँकेत दुपारी २ च्या सुमारास खात्यातून रक्कम काढण्याकरिता गेले. मोटारसायकल बाहेर ठेवून उपरीकर यांनी बँकेत प्रवेश केला. त्यांच्या मागावर चार भामटे बँकेबाहेर बसले होते. दरम्यान उपरीकर यांच्या मोटारसायकलचा प्लग चार भामट्यांनी काढून ठेवला. उपरीकर रक्कम घेवून बँकेबाहेर पडले. मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न केला. मोटारसायकल दोन ते तीन प्रयत्नात सुरू झाली नाही. उपरीकर यांच्या चाणाक्ष बुद्धीने ते हेरले उपस्थित दोन ते तीन नागरिकांनी त्यांना याबबत सूचना केली. उपरीकर यांच्या आजूबाजूला चार युवकांच्या संशयास्पद हालचाली सुरू होत्या. उपरीकर सरळ पुन्हा बँकेत परतले. त्यांनी याबाबत व्यवस्थापकांशी संपर्क साधून सांगितले बँकेतूनच उपरीकर यांनी पोलीस निरीक्षक किशोर गवई यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला.
गवई यांनी तात्काळ पोलिसांना बँकेत पाठविले. बँकेत गेलेला इसम परत का येत नाही याची चाहूल चार भामट्यांना लागण्यास वेळ लागला नाही. चारही भामटे नंतर पसार झाले. मोटारसायकलजवळ संशयास्पद स्थितीने हालचाल करतानी चार युवक बँकेच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहेत, परंतु त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, अशी माहिती आहे. देहबोलीतून पोलिसांना त्याचा शोध करावा लागेल. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Due to the alertness of the chest,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.