बुध्द धम्मामुळे जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 12:59 AM2016-03-30T00:59:24+5:302016-03-30T00:59:24+5:30
बौध्द धम्म हा आचरणाचा धम्म आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होतो. स्वत:चा मार्ग शोधतो.
भिक्खु संघाचे प्रतिपादन : आलेबेदर येथे बौद्ध धम्म परिषद
साकोली : बौध्द धम्म हा आचरणाचा धम्म आहे. यामुळे प्रत्येक व्यक्ती प्रकाशमान होतो. स्वत:चा मार्ग शोधतो. त्यामुळे स्वत:ची दिशा गवसायला लागते. देशातील दलित समाज अंधारात पडलेला होता. परंतु भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपले जीवन अंधाराकडून प्रकाशाकडे जायला लागला. माणुस स्वाभिमानी बनत चालला. भंते प्रज्ञाज्योती यांनी या स्थळावरुन बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार केला. त्यामुळे बौध्द स्थळ म्हणुन नावारुपास येत आहे, असे प्रतिपादन बौध्द भिक्खुनी आलेबेदर येथे आयोजित दोन दिवसीय बौध्द धम्म परिषदेत व्यक्त केले.
याप्रसंगी भदंत सदानंद महास्थविर केळझर, भदंत सत्यशिल महाथेरो, भदंत धम्मदिप महाथेरो, भदंत अनिरुध्द महाथेरो, भदंत महापंथजी महाथेरो, भंदत कृपाशरण महास्थविर, भदंत नागदीपकर, भदंत संघानंद महास्थवीर, भदंत प्रियदर्शी महास्थवीर, भदंत शिलधन महास्थवीर, भदंत बुध्दघोष महास्थवीर, डॉ. भदंत धम्मसेवक महास्थवीर, भदंत ज्ञानबोधी, भदंत शिलवंश, भदंत सुगतबोधी, भदंत संघधातु, भदंत महानागरत्न, भदंत विनय बोधीप्रिय थेरो व अन्य ५० भिक्खु उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, जिल्हा परिषद सदस्या रेखा वासनिक, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, चुन्नीलाल वासनिक, सडक अर्जुनी बाजार समितीचे संचालक रोशन बडोले, डी. जी. रंगारी यांनी भगवान गौतम बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कृतीत कसा रुजविता येईल व प्रत्येक व्यक्तीला चांगले संस्कार कसे होतील याविषयी माहिती देण्यात आली. होळी पौर्णिमेच्या दिवशी लोकांना व्यसनापासून कसे परावृत्त करता येईल यावरही विचार व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी बुध्द भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये मनोज कोटांगले, सुभाष कोठारे, संविधान भारती, भिमेश भारती, स्नेहा वानखेडे, सुर्यकांता पाटील, जोशील मून, अश्विनी राजगुरु यांनी गितातुन गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले. दोन दिवशीय धम्मकुटी आलेबेदर येथे रोगनिदान व रक्तदान शिबिराचे आयोजन खांबा उपकेंद्रतर्फे करण्यात आले. त्यामध्ये डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे व त्यांची टिम यांनी परिश्रम घेतले. उपासकांनी औषधांचा लाभ घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे, महासचिव एम. आर. राऊत, गजेंद्र गजभिये यांनी सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पडली. कार्यक्रमासाठी नंद, धम्मज्योती, संघज्योती, जिवनज्योती, नागसेन, आनंद, अनिरुध्द, दीपक मेश्राम, डी. जी. रंगारी यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)