संचारबंदीमुळे रोजी गेली मात्र शिवभोजन थाळीचा मिळतोय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:35 AM2021-04-18T04:35:02+5:302021-04-18T04:35:02+5:30

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ...

Due to the curfew, the day passed but Shivbhojan plate is getting support | संचारबंदीमुळे रोजी गेली मात्र शिवभोजन थाळीचा मिळतोय आधार

संचारबंदीमुळे रोजी गेली मात्र शिवभोजन थाळीचा मिळतोय आधार

Next

जिल्ह्यात १३ शिवभोजन केंद्रे आहेत. या केंद्रांतर्गत दररोज एक हजार थाळींचे वाटप केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी संचारबंदीची घोषणा करतानाच राज्यातील सर्वसामान्य जनता तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही यासाठी शिवभोजन केंद्रातून मोफत जेवण देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांना पंधराशे रुपये मानधन देऊन मदत देण्याचा प्रयत्न केला आहे.

बॉक्स

एक हजार जणांना दररोज मिळतोय शिवभोजनाचा लाभ

१) भंडारा जिल्ह्यात १३ शिव भोजन केंद्रांतर्गत अनेकांना लाभ मिळत आहे. भंडारा शहरात चार शिवभोजन केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषद परिसरात माविमकडे असणारे एक केंद्र तर दुसरे महसूल कँटींनचे, तिसरे रुग्णालय परिसरात तर चौथे वरठी रोडवर अशी भंडारा शहरात चार ठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागातील नागरिकांना या केंद्राचा आधार घेता येतो.

२) शहरी भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना शासनाकडून ४५ रुपयाचे अनुदान देण्यात येते तर ग्रामीण भागात असणाऱ्या शिवभोजन केंद्रांना ३५ रुपयांचे अनुदान देण्यात येते. त्यामुळे गोरगरिबांना फक्त पाच रुपयात जेवण दिले जाते. आता तर मोफत शिवभोजन देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

बॉक्स

३८० ग्रॅमची शिवभोजनची थाळी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यात शिवभोजन थाळी सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातून गोरगरिबांना शिवभोजन केंद्रांतून ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम वरण, १५० ग्रॅम भात, १०० ग्रॅम भाजी असे एकूण 380 ग्रॅम वजनाची थाळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. याचा लाभ लॉकडॉऊन कालखंडातही अनेकांना झाला तर आता संचारबंदीच्या काळातही अनेक गरजू शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहेत.

कोट

१ शिवभोजन थाळीचा आम्हाला संकटाच्या काळात चांगला आधार मिळत आहे.पाच रुपयात जेवणाची थाळी आम्हाला मिळात आहे. यात दोन चपात्या, भात, वरण, भाजी असे पोटभर आणि चांगले जेवण मिळते, याचे समाधान आहे.

मोरेश्वर गजभिये, विद्यार्थी

कोट

२ गरिबांसाठी शिवभोजन थाळी सुरू करण्याचा सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. ज्यांचे कुणीही नाही, त्यांचे स्वतःचे घर नाही अशांना शिवभोजन थाळी लाखमोलाची ठरत आहे. मी अनेकदा शिवभोजनाचा आनंद घेतला आहे.

सुरेंद्र मेश्राम, भंडारा

कोट

३ दोन चपाती, वरण, भाजी, भात इतके पुरेसे जेवण शिवभोजन थाळीतून मिळते. मी गेल्या काही महिन्यापासून नियमित शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. शासनाने भंडारा शहरात शिव भोजन केंद्राची संख्या वाढवावी,अशी मागणी आहे.

अजय भुतांगे, लाखांदूर

Web Title: Due to the curfew, the day passed but Shivbhojan plate is getting support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.