लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे तलावांची दुरवस्था
By admin | Published: December 23, 2015 12:49 AM2015-12-23T00:49:27+5:302015-12-23T00:49:27+5:30
मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील तलावावर स्थानिक राजकारण्यानी व त्यांच्या सवर्मथकांनी कब्जा केल्याने तलावांचा बळी गेला आहे.
तलावांची दुरूस्ती केव्हा होणार
माजी मालगुजारी तलावाच्या दुरुस्तीची गरज
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी परिसरातील तलावावर स्थानिक राजकारण्यानी व त्यांच्या सवर्मथकांनी कब्जा केल्याने तलावांचा बळी गेला आहे. तलाव माझा व त्यातील पाणी माझ्याच शेतीसाठी आहे. इतर मेले तरी चालेल, मी मात्र जगलो पाहिजे अशा ईर्षींच्या भावनेने वागतात. तलावातील पोटात अतिक्रमण वाढल्याने सिंचन क्षेत्र घटले आहे.
राजकारणी किंवा शेतकरी अतिक्रमण व बेबंदशाही दूर करण्यासाठी पुढाकार घेताला दिसत नाही. मामा तलावाचे नुतनीकरण व राजकारणी किंवा शेतकरी अतिक्रमण व बेबंदशाही दूर करण्यासाठी दुर करण्यासाठी पुढाकार घेतांना दिसत नाही. मामा तलावाचे नूतनीकरण व खोलीकरण होण्याची गरज आहे. मोहाडी तालुक्यातील करडी पट्टा तलावांचा परिसर म्हणून ओळखला जातो. वैनगंगेच्या पूर्व काठावरील शेती सुपीक असून कृषीपंपाची सोय आहे. मात्र कोका जंगल टेकळ््यांच्या पायर्थ्यांशी असलेला मोठा परिसर तलावांच्या सिंचनावर अवलंबून आहे. वैनगंगा जवळून वाहत असली तरी या भागातील विहिरीत एक तास मोटार चालेल इतकेच पाणी नाही. संपूर्ण क्षेत्र सिंचनाने बकाल झाला आहे. फक्त खरीप पिकांपुरते पाणी साठविण्याची क्षमता येथील तलावात आहे.
यावर्षी खरीप पिकांनाही पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे तलावांच्या पायथ्याशी शेतीमध्ये दुष्काळाच्या मोठया भेगा दिसत आहेत. त्या भेगाप्रमाणे शेतकऱ्यांच काळीजही चिरले गेले. मात्र ते ना राजकारण्यांना दिसत आहे ना समाजकारण्यांना दिसत आहे ना समाजकारण्यांना शेतकरी आपल्या हक्कासाठी झटताना दिसत नाही.
ही मोठी शोकांतिका आहे. करडी परिसरात देव्हाडा, मोहगाव, नवेगाव, जांभळापाणी, करडी, किसनपुर, लेंडेझरी, जांभोरा, केसलवाडा, पालोरा, खडकी, ढिवरवाडा, बोंडे, डोंगरदेव आदि मोहाडी तालुक्यातील गावात लहान मोठया तलावांची संख्या अधिक आहे.
परिसराला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, लोहारा, चंद्रपूर माटोरा, नवेगाव आदि गावांतही तलावाची संख्या बरीच आहे. बऱ्याच तलावांच्या गेट नादुरुस्त आहेत. नवीन तयार झालेल्या गेट स्थानीक राजकारणी फसगत होते ती शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून परिसरातील तलावांच्या कामासाठी एकाच इंजिनीयरची नियुक्ती असल्याने त्यांची बदली होत नसल्याने सुध्दा त्यांचा दरारा समजण्यासारखा आहे. तलावांच्या पाळी कमकुवत आहेत. तलाव गाळाने भरलेले असल्याने सपाट झाली आहेत. गाळांचा उपसा करणे गरजेचे झाले आहे. त्यातही यंत्राच्या सहाय्याने उपसा, खोलीकरण होण्याची आवश्यकता आहे.
रोहयो कामाच्या माध्यमातून तलाव खोलीकरण्याची, गाळ उपसण्याची कामे हाती घेण्यात येत असली तरी आर्थिक तरतुदी अगदीच नगण्य असते. त्यातही इतर अकुशल कामांसाठी निधी दिली जात असल्याने अंदाजपत्रके फुगलेली दिसतात. सर्वतलावामध्ये कमीजास्त प्रमाणात अतिक्रमण शेतकऱ्यांनी केले आहे. बऱ्याचबेळी अतिक्रमण हटविण्याच्या वावडया उठतात. परंतु पाण्यावरील तरंगाप्रमाणे विरुनही जातात. प्रश्न मात्र कायम राहतो. काही तलावात तर अर्धे अधिक अतिक्रमण झाले आहे. गावकरी ग्रामसभामधून ठराव घेतात. परंतु राजकारणी राजकीय सर्मथकाच्या नाराजीमुळे आपले नुकसान होणार म्हणून त्या ठरावावर कार्यवाही करीत नाही. अतिक्रमणामुळे तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
सिंचनाच्या अपुऱ्या क्षमतेमुळे पिकांवर परिणाम होऊ न उत्पन्नात घट झाली. यावर्षी तलावाचे पाणी पुरेपूर मिळाले नाही. तलावांवर दादागिरी केल्याने कोरडया दुष्काळाचा मारा शेतकऱ्यांना बसला. राजकीय उदासीनतेमुळे अतिक्रमणे जैसे थे असून अधिकारीही त्याकडे लक्ष देत नाही. खऱ्या अर्थाने तलावांचा बळी गेला आहे. (वार्ताहर)