जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By admin | Published: July 31, 2015 01:04 AM2015-07-31T01:04:28+5:302015-07-31T01:04:28+5:30
पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सोमनाळा (बु.) येथील शाळेची इमारत फार जुनी इमारत जीर्ण झाली आहे.
सोमनाळा येथील प्रकार : शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा
चिचाळ : पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सोमनाळा (बु.) येथील शाळेची इमारत फार जुनी इमारत जीर्ण झाली आहे. शाळा केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असून विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका आहे.
सदर शाळेची स्थापना सन १९५५ ची असून शाळेची इमारतीचे फाटे व प्लॉटर सडलेला आहे. पावसाळ्यात वर्गात व भिंतीवर पाणी गळते भिंतींना भेगा पडल्या आहेत इमारत कोसळण्याची दाट शक्यता आहे.
शाळेच्या षटकोनी इमारतीला अजून दहा वर्षे पूर्ण व्हायची आहेत तरी बांधकामाचा निकृष्ठ दर्जाचे असल्याने इमारतीची अवस्था फार नाजूक आहे. षटकोनी इमारतीत शाळेचा कार्यालय आहे. इमारतीला गळती असल्याने शिक्षकांना छत्रीचा वापर घ्यावा लागतो. पोर्चच्या खालील भागाचे प्लॉटरचे पोपळे नेहमी पडत असतात व सलाखी जंगलेल्या आहेत. सदर समस्ये विषयी शिक्षण विभाग जि.प. भंडारा व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पवनी यांनी अनेकदा लेखी तोंडी ठराव पाठवूनही संबंधित विभाग कानाडोळा करीत आहे. अनुचित घटना होण्या अगोदरच शाळा बांधकामाला मंजूरी प्रदान करावी अन्यथा शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)