धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:48 AM2018-09-21T00:48:17+5:302018-09-21T00:49:23+5:30
चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : चारशे चाळीस लक्ष रुपये खर्चाचे तुमसर राज्य मार्ग ३५५ वर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरु असल्याने तुमसर शहर स्वच्छ शहर ओळख गत दोन महिन्यापासून लोप पावत असून धूळयुक्त शहर अशी नविन ओळख आता तुमसर शहराने निर्माण केली आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी न.प. प्रशासनालाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
कामाची निविदा मिळताच कामाचे रनिंग बिल काढण्याच्या लगिन घाईने संबंधित कंत्राटदाराने दुहेरी मार्गावर होत असलेल्या कामाला भर पावसाळ्यात पर्यायी मार्गाची कसलीही दुरुस्ती व पर्यायी व्यवस्था न करता रस्ता खोदकामास सुरुवात केली. त्यामुळे एकेरी मार्गावर आधीच पडलेल्या मोठमोठ्या खड्यातून वाहतुक वाढल्याने त्या खड्यात भ्ज्ञर पडली व रस्त्याचे जणू मिनी जलतरणच झाले. तरी देखील संबंधित कंत्राटदाराला व सा. बा. विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नसल्याने लोकमत समस्या उचलून धरताच वेळोवेळी खड्यात मुरुम व ऐश मिश्रीत चुरी पावसाळ्यात घालण्यात आली. परंतु आता पावसाने चांगलीच उघडीच घेतली आहे.
त्यामुळे रस्त्यावरुन जड वाहने जाताच धुळीचा अक्षरक्षा धुवार उडतो. सामोरचा व्यक्ती वा वाहनही दिसत नाही. एवएी धुळ त्या रस्त्यावर दिसून येते. ही धूळ सरळ नागरिकांच्या तोंडावाटे शरीरात जात असल्यामुळे नागरिकांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. संबंधित कंत्राटदाराने १५ टक्के बिलामध्ये काम घेतल्याने तो मुत्सुद्देगिरीचा वापर करुन व अधिकारी तसेच पदाधिकारीशी जवळीक साधून आहे. त्यामुळे मै करु सो कायद्याची परिचय देत सुरु असलेल्या कामावर वाटर क्युरिंग तो योगय रित्या करीत नाही. तर काय रस्त्यावर पाणी घालणार त्या नागरिकाच्या आरोग्याची काळजी नाही. पंरतु न.प.ला तर आहे. मग स्वच्छतेवर ऐवढा अतोनात खर्च करणारी न.प. प्रशासनाला हे का तर दिसत नसावे असा सवाल तुमसरकरांनी करुन तुमसर शहराला धूळ मुक्त करण्याची मागणी आहे.
‘‘गत दोन महिन्यापासुन नागरिक धूळीचा त्रास सहन करीत आहे. व्यवसायीकांच्या दुकानात कीलोने धूळ जमा होत असतांना लाखो रुपये खर्चुन न.प. प्रशासन इंदुरची पाहणी करण्याकरिता गेले. मात्र शहराकडे लक्ष पुरवायला यांच्याकडे वेळ नाही.
-प्रमोद तितीरमारे,
काँग्रेस प्रदेश सचिव काँग्रेस