धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य आले धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 09:56 PM2019-01-04T21:56:47+5:302019-01-04T21:57:02+5:30
शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक मार्गाचे बांधकाम उशिरा का होईना नाली बांधकामाचे रूपाने सुरू झाले आहे. परंतु त्यापुर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यावर चुरी घालण्यात आली होती. ही चुरी आता नागरिकांच्या जीवावर बेतते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील अत्यंत वर्दळीचा समजल्या जाणाऱ्या राजीव गांधी चौक ते जिल्हा परिषद चौक मार्गाचे बांधकाम उशिरा का होईना नाली बांधकामाचे रूपाने सुरू झाले आहे. परंतु त्यापुर्वी खोदकाम केलेल्या रस्त्यावर चुरी घालण्यात आली होती. ही चुरी आता नागरिकांच्या जीवावर बेतते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. डिसेंबर महिन्यात या रस्त्याचे बांधकाम थांबल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरून खोदलेल्या रस्त्यावर मुरूम व चुरी घालण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्त्याकडे कुणीही ढुंकून पाहिले नाही. धुळ उडण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
विशेषत: या मार्गावरील असलेली कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने व रहिवासी यांचा सर्वात मोठा फटका बसत आहे. चुरीमुळे उडणारी धुळ थेट श्वासाद्वारे फुफ्फुसात जात असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होईल याची शक्यता नाकारता येत नाही. या चुरीवर बांधकाम पूर्ण होईपर्यंत पाणी घालणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
मोठ्या प्रमाणात उडणारी ही धुळ बांधकाम करणाºयांना व अधिकाºयांनाही दिसत नसावी काय, असा प्रश्न नागरिक विचारीत आहे.