आवारभिंतअभावी विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात
By admin | Published: October 7, 2016 12:50 AM2016-10-07T00:50:35+5:302016-10-07T00:50:35+5:30
दावेझरी टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आवारभिंत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे.
दावेझरी येथील प्रकार : नहर व खड्ड्यामुळे भीती
चुल्हाड (सिहोरा) : दावेझरी टोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आवारभिंत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक मागील बाजुला ५० ते ६० फुल खोल खड्डा आहे. या खड्ड्यात पाणी साचलेले असून खड्ड्यालगत शौचालय व मुत्रीघरांचे बांधकाम झाले आहे. यामुळे महिला जास्त विद्यार्थ्यांना शौचालय आणि मुत्रीघरांचा उपयोग करावा लागत आहे. या खड्ड्यात विद्यार्थ्यांचा हकनाक बळी जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शिवाय शाळेच्या समोरील भागात मैदान असून चांदपूर जलाशयाचे येरली वितरीकेचे मुख्य कालवा आहे. या कालव्यालगत विद्यार्थी खेळत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी वाटपात या कालव्यात बुडून अनेक बालकांचा मृत्यू झाला असतानाही प्रशासनाने याची अद्याप गंभीर दखल घेतलेली नाही. ग्रामपंचायतीने पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाकडे आवारभिंत बांधण्याचा प्रस्ताव पाठविला परंतु अद्यापही तो मार्गी निघालेला नाही. (वार्ताहर)