सोयींअभावी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात!

By admin | Published: August 2, 2016 12:39 AM2016-08-02T00:39:19+5:302016-08-02T00:39:19+5:30

खोकरला येथे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनासह स्थानिक राजकीय ...

Due to lack of facilities, health of the students! | सोयींअभावी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात!

सोयींअभावी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात!

Next

खोकरला जि. प. शाळेतील प्रकार : प्रशासनासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
भंडारा : खोकरला येथे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रशासनासह स्थानिक राजकीय कार्यकर्ते आणि गावपुढारी समजवून घेणारे ग्रामपंचायतचे पदाधिकारी हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
खोकरला ग्रामपंचायत ही सद्या अनेक समस्यांच्या कारणावरून चर्चेत आहेत. त्यात भर पडली आहे ती गावात असलेल्या जि.प.च्या प्राथमिक शाळेच्या परिसरात असलेल्या समस्यांची.
खोकरला येथील शाळेत इयत्ता १ ते ५ पर्यंत विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात.
मात्र, या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्यद्वारापासून समस्यांचा सामना करावा लागतो. त्यानंतर शाळेच्या संरक्षण भिंत परिसरात विद्यार्थ्यांसाठी शौचालय, मुतारीघर तसेच परिसरात असलेल्या विहीरीच्या आजुबाजूला वाढलेले गवत व त्यात टाकण्यात आलेल्या वस्तुंमुळे पाण्याची दुर्गंर्धी तसेच शाळेच्या इमारतीला लागून असलेली कचराकुंडी, शाळा सुटल्यानंतर उघडेच राहणारे शाळेचे मुख्यद्वार व मागिल बाजूने संरक्षण भिंतींला व्दार नसल्याने कोणत्याही क्षणी शाळा परिसरात जनावरे व इतरवेळी जुगार खेळणारे येवून घाण करतात. या प्रकाराकडे शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होवून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एकीकडे देश स्वच्छता मोहीम राबवून 'स्वच्छ व सुंदर भारत' व्हावा, याकरिता शासनाकडून प्रयत्न होत आहे. येथे मात्र, शाळेच्या परिसरातील वातावरण पहाता येथे जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक राजकीय कार्यकर्ते येथे शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयी किती उदासीन आहे हे यावरून दिसून येते.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असूनही नसल्यासारखीच आहेत. स्वच्छतागृहांना कुलूपांचे संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहांचा विद्यार्थ्यांना उपयोग घेता येत नाही, तर कुलूपमुक्त स्वच्छतागृहांची परिस्थिती विदारक आहे. येथे असलेली घाण, व्दारापासून असलेले चिखल, साचलेला कचरा, बोअरवेलवर जंगलेल्या अवस्थेत असलेल्या पिंपाचे झाकण, दुर्गंधी तसेच शाळेच्या व्दारासमोर असलेल्या विद्यूत वितरणच्या डीपीला नसलेले झाकण आदी समस्या आहेत. अशा भयानक वातावरणात ज्ञानार्जनासाठी शाळेत येणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला कार्यभाग उरकावा लागतो.
सदर प्रकाराचा शाळा व्यवस्थापनाला बालकांच्या अधिकाराचा विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)

सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा खर्चही करण्यात येत आहे. मात्र खोकरला येथील जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा परिसरातील असलेला प्रकार पाहता या निधीचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.
शासन निर्णय कागदोपत्रीच
विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुिवधा मिळाव्यात, विशेषत: प्रत्येक शाळेत मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळे स्वच्छतागृहे असावे, असा निर्णय शासनाने एस. एन. एन. / १०९९/(२४०/९९) उमाशि-२ दिनांक २२ डिसेंबर २००० नुसार जारी केला. परंतु, हा शासन निर्णय कागदोपत्रीच राहिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे.

Web Title: Due to lack of facilities, health of the students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.