शेतीकडे दुर्लक्षामुळे आरोग्यावर वाईट परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:53 PM2017-09-29T23:53:48+5:302017-09-29T23:53:59+5:30
कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषी क्षेत्रातील धोका व जोखीम यामुळे शेतकºयांमध्ये जाणीवेच्या अभावामुळे शेतकरी वर्गात आरोग्य समस्या उदयास आलेल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या मृत्यूचे प्रमाण व अपघातात वृद्धी घडून आली आहे. शेतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे प्रतिपादन भाष्कर टीचकुले (दुबई) यांनी केले.
स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे समाज विज्ञान अभ्यास मंडळातर्फे आयोजत विकसनशील यांत्रिकी आणि कृषी क्षेत्रातील स्वास्थ्य व सुरक्षितता विषयक जाणीव या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगीमंचावर डॉ. सिद्धार्थ मेश्राम, प्रा. अनिल भांडारकर, डॉ. दिपक राऊत, डॉ. राहुल मानकर उपस्थित होते.
टीचकुले म्हणाले की , आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेनुसार जगात कामाच्या ठिकाणी ३ लाख ३५ हजार अपघात होतात त्यापैकी १ लाख ७० हजार कृषीक्षेत्रात मृत्युचे प्रमाण आहे.
यासंदर्भात त्यांनी विस्तृत आकडेवारी प्रस्तुत करून शेतकºयांची सुरक्षितता निर्माण करण्यासाठी व त्यामध्ये जाणीव- जागृती निर्माण होण्यासाठी शासनाद्वारे आणि शेतकºयांच्या सामाजिक संघटनांद्वारे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आव्हान त्यांनी केले. भारतातील शेती प्रश्नांची चर्चा करताना ते म्हणाले की विकसनशील देशात शेतीतील अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात २६३ मिलीयन लोक शेतीवर अवलंबून आहेत, यापैकी स्त्रियांच्या वाटा ३७ टक्के आहे.
शेती प्रक्रियेतउपयोगात आणल्या जाणाºया ट्रॅक्टर, थ्रेशर मशिन, खते व किटकनाशकांमुळे शेतकºयांना बहिरेपणा, दमा, विषबाधा, कॅन्सर सारखे आजार होतात आणि अनेकदा मृत्यू घडून येतात.
या क्षेत्रातील अपघातांची शासकीय स्तरांवर कोठेही नोंद होत नाही. कृषी-यंत्र आणि उत्पादक आणि कीटकनाशक विक्रेते शेतकºयांनाही योग्य माहिती उपलब्ध करून देत नाहीत. त्यामुळे आता शासकीय स्तरावर सुरक्षितता प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
प्रास्ताविक गणेश खडसे यांनी तर संचालन विक्की राऊत व तितीक्षा रंगारी यांनी केले. विवेक मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गायत्री हिरापुरे, समीर कावरे, सुशुप्ती काळबांडे, कौतुक मेश्राम, अमिता राऊत, निखद शेख, आयुषी गजापुरे, गौरी ब्राम्हणकर यांनी सहकार्य केले.