रेती पसरविल्याने रस्ता बनला जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 11:54 PM2017-11-04T23:54:03+5:302017-11-04T23:54:26+5:30

डोंगरला-नवरगाव रस्त्या शेजारील सुमारे २०० ब्रास रेतीचे ढिगारे महसूल प्रशासनाने भुईसपाट केली. ही रेती रस्त्यावर पसरवून समतल केली.

Due to the spread of the sand, the road became fatal | रेती पसरविल्याने रस्ता बनला जीवघेणा

रेती पसरविल्याने रस्ता बनला जीवघेणा

Next
ठळक मुद्दे२०० ब्रास रेती रस्त्यावर : प्रकरण डोंगरला-नवरगाव मार्गाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : डोंगरला-नवरगाव रस्त्या शेजारील सुमारे २०० ब्रास रेतीचे ढिगारे महसूल प्रशासनाने भुईसपाट केली. ही रेती रस्त्यावर पसरवून समतल केली. सध्या हा रस्ता निसरडा झाला असून ये-जा करणाºया शेतकºयांना कमालिचा त्रास सहन करावा लागत असून अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता ठरला आहे. रस्त्यावर रेती पसरविण्याचा निर्णय कसा घेतला हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
डोंगरला-नवरगाव रस्त्यावर सुमारे १५० ते २०० ब्रास अवैध रेतीसाठा रेती माफियांनी केला होता. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले. त्यानंतर महसूल प्रशासनाने जेसीबीने रेतीसाठा भुईसपाट केला. रेती भुईसपाट करताना सर्व रेती रस्त्यावर पसरविली. सध्या या रस्त्यावरून जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ता निसरडा झाला आहे. सायकल, दुचाकी, बैलबंडीही सुरक्षित नेता येत नाही. जीव मुठीत घेऊनच येथून मार्गक्रमण करावे लागत आहे.
तहसील प्रशासनाने रस्त्यावर रेती पसरविल्यानंतर येथे संभाव्य धोक्याची माहिती नव्हती का, ही कारवाई करताना ८ ते १० तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसिलदार उपस्थित होते. नियम व कर्तव्य बजाविण्याची हमी देणाºया वरिष्ठ अधिकाºयांनी असा एकतर्फी निर्णय कसा घेऊ शकतात हाच मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता अडविणे तथा बंद करण्याचाच हाच मुख्य प्रश्न येथे उपस्थित होत आहे. रस्ता अडविणे तथा बंद करण्याचाच हा एक प्रकार आहे.
रेती साठा काही एका दिवसात झाला नाही. तेव्हा तलाठी, मंडळ अधिकारी व या साझ्याचे मंडळ नायब तहसीलदार जबाबदार आहेत. रेती घाट बंद असताना रेतीची चोरी नदी घाटातून सुरू आहे. नियमांचे दाखले देऊन ऊंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार मागील काही महिन्यापासून सुरू आहे.
महसूल अधिकाºयांच्या भ्रमणध्वनीची चौकशी केली तर रेतीमाफिया व अनेक कंत्राटदारांची नावे सेव्ह आहेत. जी कां आहेत हा संशोधनाचा विषय आहे. तुमसर शहरापासून केवळ तीन कि़मी. अंतरावर अवैध रेतीचा साठा एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळला तर संपूर्ण तालुक्यातील रेती घाट सुरक्षित नाही, असे दिसून येते. नियमबाह्यपणे रेती मातीमोल करणाºया महसूल प्रशासनाला जिल्हा प्रशासन जाब विचारणार काय, की केवळ कागद पाठवून खुलासा मागविणार हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.

डोंगरला-नवरगाव रस्त्यावर महसूल प्रशासनाने अवैध रेती साठा भुईसपाट केला. येथे मार्गक्रमण करताना जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. रस्ता पूर्वीसारखा करण्याची गरज असून शेतकºयांना कमालीचा त्रास होत आहे.
- शंकर राऊत, अध्यक्ष
तालुका काँग्रेस तुमसर.

Web Title: Due to the spread of the sand, the road became fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.