अवकाळी पावसामुळे सात एकरातील धान मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:34 AM2021-05-15T04:34:03+5:302021-05-15T04:34:03+5:30
खराशी : वादळ वा वाऱ्यासह वादळ व गारपिटीने उन्हाळ्यातील रब्बी धान पिकावर संकट ओढवल्याने पालांदूर ...
खराशी : वादळ वा वाऱ्यासह वादळ व गारपिटीने उन्हाळ्यातील रब्बी धान पिकावर संकट ओढवल्याने पालांदूर परीसरातील भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढविली आहे. खुनारी गावात मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाचे पीक घेतले जाते. पण वादळ व गारपिटीमुळे भास्कर तुळशीराम बाबनकुळे (रा. खुनारी) यांच्या सात एकरांतील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसाने कोरोना संकटाशी आधीच झगडत असलेले शेतकरी संकटात सापडले आहेत. काही शेतकरी असेही म्हणतात की लागवडीसाठी केलेली किंमत वसूल करणेदेखील अवघड आहे. अवेळी पावसामुळे तयार झालेल्या धान्याच्या पोत्या घरांच्या अंगणात ठेवल्या गेल्या, त्या ओल्या झाल्या. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील धानाच्या लोंब्या जमीनवर कोसळले आहे. उन्हाळी रब्बी भात पिकाचे पीक बहुतेक शेतकरी महागड्या मजुरीमुळे कापणी करणाऱ्या मजुरांकडून कापणी करतात, परंतु धान जमिनीवर पडत असल्याने कापणी करणे अवघड आहे. कापणी करणाऱ्यांनी काढणी केल्यामुळे शेतकरी कमी खर्च करतात, परंतु पावसामुळे शेतात ओले झाली आहेत, त्यामुळे हे मशीन शेतात जाऊ शकत नाही, यामुळे शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने पंचनामा करुन नुकसानीची भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कोट बॉक्स
पालांदूर व लगतच्या गावात उन्हाळी रब्बी भात पिकाची लागवड केली जाते. वादळी वाऱ्यासह पावसाने व गारपिटीने शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. गेल्या एक वर्षापासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे, कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, उन्हाळ्यातील रब्बी धान पीक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु अवकाळी पावसाने त्यांची चिंता वाढविली आहे, म्हणूनच सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या धान पिकांचा पंचनामा करून मदत करावी.
भास्कर बावनकुळे, शेतकरी, खुनारी