अवैध स्फोटकांच्या वापराने घरांना तडे जाण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:20 PM2019-02-13T22:20:26+5:302019-02-13T22:20:42+5:30

जिल्ह्यात रस्ता बांधकामाची कामे सुरु आहेत.या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम, गिट्टीची आवश्यकता आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधपणे गौण खनिजांचे उत्खनन सुरु आहे. तरीही महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने केला आहे.

Due to the use of illegal explosives, the fear of cracking down the houses | अवैध स्फोटकांच्या वापराने घरांना तडे जाण्याची भीती

अवैध स्फोटकांच्या वापराने घरांना तडे जाण्याची भीती

Next
ठळक मुद्देकारवाईसाठी राष्ट्रवादीचा पुढाकार : जनतेच्या आरोग्यावरही परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : जिल्ह्यात रस्ता बांधकामाची कामे सुरु आहेत.या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरुम, गिट्टीची आवश्यकता आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधपणे गौण खनिजांचे उत्खनन सुरु आहे. तरीही महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस पक्षाने केला आहे.
तालुक्यातील पोहरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मेंढा या गावतील गट क्र. १५४ येथील एकुण १८ हेक्टर जागेत पहाडी आहे. या पहाडीवर विपुल प्रमाणात गौण खनिज उपलब्ध असल्यामुळे एकुण १८ हेक्टर जागेपैकी ०.८० आर जागेत विजय देशमुख यांना व २ हेक्टरमध्ये मे. शिवालय कंस्ट्रक्शन कपंनी प्रा. लि. या कंपनीला शासनामार्फत उत्खननाची परवानगी देण्यात आलेली आहे. देशमुख यांना दिलेली जागा शासनाने नियोजित करुन देणे आवश्यक होते. परंतु शासनाने नियोजन करुन न दिल्यामुळे मनमर्जीने ०.८० आर. जागेपेक्षा अधिकच्या जागेवर स्फोटके वापरण्याची परवानगी नसतांना सुध्दा स्फोटकाद्वारे उत्खनन करीत आहे. त्यामुळे परिसरातील मेंढा, गडपेंढरी, पोहरा येथील घरांना जबदरस्त हादरे बसत आहेत. त्यामुळे घरांना तडे जाऊन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
कंपनीने पहाडी परिसरात क्रशर मशिन लावल्यामुळे पहाडीखाली असलेला तलाव प्रदूषित झाला आहे. वन्यप्रणी तहाण भागविण्याकरिता गावात येत असल्यामुळे गावात सर्वत्र भितीचे वातावरण आहे. क्रशर मशीनीतून निघणाºया धुळीमुळे वायु प्रदुषण होऊन मेंढा, गडपेंढरी व पोहरा गावातील नागरिकांना आजार जडले आहेत. धुळीमध्ये शेतीचे नुकसान आहे. मशिनीच्या आवाजाने विद्यार्थ्यांना व नागरिकांना रात्री झोपण्यास त्रास होत आहे. अवजड वाहनामुळे पोहरा ते मंढा हा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. सदर कंपनीवर ७ दिवसात कारवाई करण्यात यावी अशी मागणी राकॉचे शहर अध्यक्ष धनु व्यास, विवेक गिरीपुंजे, मोरेश्वर दोनोडे, नागशेष शेंडे आदींनी केली आहे.

Web Title: Due to the use of illegal explosives, the fear of cracking down the houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.