गोसखुर्द धरणाच्या पाण्यामुळे शेती, रस्ते जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:54 PM2019-08-28T23:54:49+5:302019-08-28T23:55:19+5:30
खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा तालुक्यातील खैरी, सालेबर्डी येथील रस्ते व शेत जमीन गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे जलमय झाल्याने प्रकल्पग्रस्त संकटात सापडले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शेत पडीक राहण्याची शक्यता वाढली आहे.
खैरी, सालेबर्डी हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात आहेत. येथील शेतकऱ्यांना घरांचा व शेतीचा अल्प मोबदला मिळाला. काही घरे शासनांने संपादित केले नाही. सदर गावात अनेक प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांची शेतजमीन शासनाने गोसेखुर्द प्रकल्पासाठी संपादित केल्यात, परंतु पांधी गावातील शेतकºयांची ३० एकर, सालेबर्डी १० एकर, खैरीतील शेतकºयांची ४० एकर शेतजमीनी अजुनपर्यंत शासनाने संपादित केलेल्या नाही. काही शेतकºयांनी शेतीत धान, तुर, व अन्य पीके घेतली आहेत. पण आता शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरच गोसेखुर्द धरणाचे पाणी साचले आहे. शेतीवर जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. त्यामुळे काही शेतकºयांवर शेत पडीक ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शासन, प्रशासन शेतकºयांच्या या समस्येची दखल घेणार काय, असा प्रश्न येथील प्रभारी सरपंच, मनोहर मेश्राम व शेतकºयांनी कली आहे.
आता पावसाळ्याच्या दिवसात शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरच पाणी साचले. चारही बाजुंनी पाणी वेढले तर काही शेतकºयांची पिके पाण्याखाली गेली. काही शेतकºयांनी पाणी वाढत असल्याचे दिसताच शेतजमीन पडीतच ठेवली. नुकसान भरपाईची मागणी होत आहे.