सितेपार येथे रेतीची डम्पिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:02+5:30
सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा): पोलीस आणि महसुल विभागाचे कारवाईला लाजवेल असे रेतीचे डम्पिंग यार्ड सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात आले आहे. या डम्पिंग यार्डला अभय कुणाचे आहे. असा संतापजनक सवाल गावकरी करीत आहेत. परंतु कारवाई होत नसल्याचा आरोप गावात आहे.
सिहोरा परिसरात वैनगंगा बावनथडी नद्याचे पात्र आहे. बावनथडी नदी पात्रात पाणी असल्याने रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावर असणाऱ्या तामसवाडी, सितेपार गावाचे शिवारात नाकी नऊ आणणारे डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या डम्पिंग यार्डानी डोंगरला, खैरलांजी गावाची सिमा ओलांडली आहे. रेती माफीयांनी डम्पिंग यार्ड तयार करतांना वन विभागाचे झुडपी जंगलाचे क्षेत्र सोडले नाही. ट्रॅक्टर चालकांवर ऐरवी कारवाई करणारी यंत्रणा ट्रक चालक विरोधात कारवाई करीत नाही. सितेपार गावाचे शिवारात दीड एकर जागेत रेतीचा डम्पिंग यार्ड तयार करण्यात आलेला आहे. गावाला या डम्पिंग यार्डनी वेढा घातला आहे. या गावात रिकामी जागा शिल्लक नाही. गावाचे शिवारात प्रवेश करताचे रेती डम्पिंग यार्ड स्वागत करताना दिसून येत आहेत. यानंतर मोहगाव ते सितेपार मार्गावर रस्ता लगत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आली आहे. या यार्डातील रेती थेट रस्त्यावर आली आहे. यामुळे वाहनधारकांचे अपघात सुरु झाली आहे.
तामसवाडी हद्दीत उपसा : महसूल पाण्यात
तामसवाडी गावाचे हद्दीतून रेतीचा उपसा करण्यात येत असला तरी डम्पिंग यार्ड मात्र सितेपार गावाचे शिवारात तयार करण्यात येत आहेत. या आधी तामसवाडी गावातील नागरिकांनी रेतीची चोरी व डम्पिंग यार्ड विरोधात कारवाई करिता थेट तहसीलदाराचे कार्यालय गाठले होते. परंतु ट्रक विरोधात कारवाई करिता पुढाकार घेत नाही. गरीब आणि सामान्य नागरिक या व्यवसायात नाही. सधन आणि धनाढ्य माफिया या व्यवसायात असल्याने गावकरी भयभीत आहेत. त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासन प्रशानाने माफियांचे समोर नांगी टाकल्याचा आरोप गावात आहे.