फेरफारविना सुरू आहेत डम्पिंगची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:31 PM2018-06-18T23:31:57+5:302018-06-18T23:32:09+5:30
जलयुक्त शिवार हा उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे, परंतु डोंगरी येथील खुल्या खाण परिसरातील गट क्रमांक १८२, १८४ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे तीन ते चार तलाव डम्पिंग करून बुजविण्यात आले आहे. कुरमुडा रस्त्याशेजारी डम्पींग ग्राऊंड धोकादायक असून मॉईल प्रशासनाला दिलेल्या भाडेतत्वावरील जमिनीची अजुनपर्यंत सात बारा वर नोंद नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जलयुक्त शिवार हा उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे, परंतु डोंगरी येथील खुल्या खाण परिसरातील गट क्रमांक १८२, १८४ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे तीन ते चार तलाव डम्पिंग करून बुजविण्यात आले आहे. कुरमुडा रस्त्याशेजारी डम्पींग ग्राऊंड धोकादायक असून मॉईल प्रशासनाला दिलेल्या भाडेतत्वावरील जमिनीची अजुनपर्यंत सात बारा वर नोंद नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज. येथे मॅग्नीज खाण आहे. खाणीचे क्षेत्रफळ १७४.८० हेक्टर इतके आहे. त्यापैकी २९ हेक्टर क्षेत्रफळात डम्पींग निरूपयोगी यार्ड तयार करण्यात आले आहे. सन १९७७ मध्ये खाणीला भाडेतत्वावर जमिन प्राप्त झाली होती. ५३.९८ हेक्टर जमिन पुन्हा सन २००१ मध्ये महसूल विभागाने मंजूर केली. गटक्रमांक १८२ व १८४ मध्ये तलाव पाण्याने बाधीत असा उल्लेख महसूल प्रशासनाच्या कागदावर नमूद आहे. सदर गटात तीन ते चार तलाव होते. मॉईल प्रशासनाने जमिन मिळाल्यावर डम्पींग करून तलाव बुजविल्याची धक्कादायक माहिती आहे.
मॉईल प्रशासन नियमानुसारच कामे करीत असून लिज प्राप्त जागेवरच डम्पींग केली जात आहे. फेरफारकरिता महसूल विभागाकडे अर्ज केला आहे. शासकीय तलाव नष्ट झाल्याची माहिती नाही, अधिक माहितीसाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज सादर करावा.
-यु.एम. भुजाडे,
खान व्यवस्थापक डोंगरी बु.