रस्त्याशेजारी कचऱ्याचा ‘डम्पिंग यार्ड’

By admin | Published: June 23, 2016 12:23 AM2016-06-23T00:23:20+5:302016-06-23T00:23:20+5:30

रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल्वे, सुंदर रेल्वे असे घोषवाक्य दिले आहे. तुमसर रोड येथे रेल्वे परिसरातून गावात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा डम्पिंग यार्ड तयार केले असून ...

Dumping yard on the road | रस्त्याशेजारी कचऱ्याचा ‘डम्पिंग यार्ड’

रस्त्याशेजारी कचऱ्याचा ‘डम्पिंग यार्ड’

Next

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : रेल्वेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
मोहन भोयर तुमसर
रेल्वे प्रशासनाने स्वच्छ रेल्वे, सुंदर रेल्वे असे घोषवाक्य दिले आहे. तुमसर रोड येथे रेल्वे परिसरातून गावात जाणाऱ्या रस्त्यावर कचरा डम्पिंग यार्ड तयार केले असून कचरा फेकल्यावर त्याला आग लावण्यात येते. दिवसभर तेथून धूर निघतो. दुर्गंधीमुळे परिसरातील आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेचे तुमसर रोड हे महत्वपूर्ण रेल्वे जंक्शन आहे. सुमारे ३५० ते ४०० रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सदनिका येथे आहेत. याशिवाय वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांचे येथे निवासस्थान आहे. रेल्वे सदनिकेतील कचरा दरदिवशी एका लहान माल वाहतूक वाहनातून तुमसर-गोंदिया राज्य महामार्गाच्या शेजारी रिकाम्या जागेवर कचरा आणून फेकले. कचऱ्याचा डम्पिंग यार्ड येथे तयार झाला आहे. रिकामा भुखंड हा रेल्वेचाच आहे. कचरा फेकल्यावर त्याला आग लावण्यात येते. दिवसभर या कचऱ्यातून धूर बाहरे पडतो. या कचऱ्यात प्लॉस्टिकचाही समावेश असतो. दुर्गंधीयुक्त उग्रवास परिसरात येतो.
रस्त्यावर रेल्वे प्रशासनाने डम्पिंग यार्ड तयार केला आहे. तेथून रेल्वे कर्मचारी व ग्रामस्थ ये-जा करतात. जवळच रेल्वे सदनिका व ग्रामस्थांची वस्ती आहे. हवेमुळे ही दुर्गंधी गावात पसरते.
रेल्वे प्रशासनाने स्वत:च्या मोकळ्या जागेवर कचरा न फेकता डम्पिंग यार्ड तयार करण्याची गरज आहे. रस्त्याशेजारी कचरा न फेकता दूर रेल्वेच्या रिकाम्या जागेवर त्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. रेल्वे प्रशासन स्वच्छतेचा दावा नेहमी करते, परंतु येथे त्यांचा दावा फोल ठरला आहे. रेल्वेच्या स्थानिक वरिश्ठ अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Dumping yard on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.