सणासुदीच्या दिवसात एसटीत प्रवाशांची गर्दी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:40 AM2021-08-20T04:40:53+5:302021-08-20T04:40:53+5:30
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता अनेक मार्गावरील एसटी बसेस धावू लागल्या आहेत. हिंदू धर्मीयांचा पवित्र सण ...
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता अनेक मार्गावरील एसटी बसेस धावू लागल्या आहेत. हिंदू धर्मीयांचा पवित्र सण असलेल्या श्रावण महिन्यातील दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनासाठी भाऊ आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जातो. तसेच अनेकवेळा बहीणही आपल्या भावाकडे राखी बांधण्यासाठी जाते. बहीण भावाचा असलेला राखी पौर्णिमेच्या सणासाठी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आतापासूनच विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. यापूर्वीच भंडारा आगारातून अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ मार्गावर बसेस वाढवल्या आहेत. अनेक मार्गावर बस वाढवल्याने एसटीच्या प्रवासी क्षमतेत वाढ झाली आहे. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बॉक्स
प्रवाशांची गर्दी
कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून रक्षाबंधन सणाला अनेकांना मुकावे लागले होते. मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी कुटुंबासह जाता येणार आहे. भंडारा बसस्थानकात गर्दी प्रवाशांची गर्दी होत आहे.
कोट
भंडारा आगार हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे येणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्ताने ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या मार्गावरील अनेक एसटी बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे.
फाल्गुन राखडे,
आगार व्यवस्थापक, भंडारा
बॉक्स
या मार्गावर वाढल्या बस
भंडारा आगारातून भंडारा नागपूर, भंडारा तुमसर, भंडारा अकोला, यवतमाळ मार्गावर बसफेऱ्या वाढल्या आहेत. एसटीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच विशेष गाड्यांचे नियोजन करून बस फेऱ्या वाढवल्या आहेत.