पावसाळ्यातही सूर्य ओकतोय आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:42 PM2018-06-25T22:42:56+5:302018-06-25T22:43:23+5:30

मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

During the monsoon sun octane fire | पावसाळ्यातही सूर्य ओकतोय आग

पावसाळ्यातही सूर्य ओकतोय आग

googlenewsNext
ठळक मुद्देपावसाने मारली दडी : उकाड्याने नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मृग लागल्यानंतर सुरूवातीचे दोन-तीन दिवस चांगली हजेरी लावल्यानंतर आता मात्र पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाळा परतून आल्यासारखे वातावरण तापू लागले असून कधी पाऊस बरसतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
७ जून पासून पावसाळा सुरू होतो. हवामान खात्यानेही यंदा पावसाळा सुरूवातीपासूनच खुश करणार, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र त्यांचा अंदाज चूक ठरत असल्याचेही दिसून येत आहे. सुरूवातीचे दोन-तीन दिवस पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता व सर्वांना उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. वातावरण थंड झाल्याने सर्वच खुश होते. मात्र आता आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याचे दिसून येत आहे. परिणामी वातावरण पुन्हा तापू लागले आहे.
विशेष म्हणजे उन्हापासून पाण्याची वाफ होत असून या उमसमुळे जीव कासावीस होऊ लागला आहे. उन्ह पुन्हा उन्हाळ््यासारखे तापू लागले असून घराबाहेर पडण्यासाठी विचार करावा लागत आहे. त्यामुळे आता पाऊस लवकर बरसावा, यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
जून महिन्याचा आता शेवट असून फक्त दोन-तीन दिवसच पाऊस पडल्याने हा महिनाही असाच तर निघत नाही ना असा प्रश्न ही पडत आहे.
पारा ३८ डिग्रीच्या घरात
पावसाळा सुरू झाला असूनही जिल्ह्याचा पारा आजही ३८ डिग्रीच्या घरात आहे. यावरून उकाड्याचा अंदाज लावता येतो. आता पाऊस पडल्यावरच यावर काही तोडगा निघणार व पारा खाली उतरल्यावरच उकाड्यापासून सुटका मिळणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून पाऊस बरसण्याची वाट बघत आहेत.
११५.५ मिमी बरसला पाऊस
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात २५ जून पर्यंत ११५.५ मिमी पाऊस बरसल्याची नोंद घेण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यात १५२.० मिमी बरसला असून सर्वात कमी पाऊस तुमसर तालुक्यात ५९.५ मिमी बरसल्याची माहिती आहे. याशिवाय मोहाडी तालुक्यात १०९.९ मिमी, पवनी तालुक्यात १०३ मिमी, साकोली तालुक्यात १२९.८ मिमी, लाखांदूर तालुक्यात १४३.४ मिमी, लाखनी तालुक्यात ११०.८ मिमी असा एकूण ८०८.७ पाऊस बरसला असून त्याची सरासरी ११५.५ एवढी आहे.
हवामान खात्याचा अंदाज चुकला
हवामान खात्याकडून आतापर्यंत पावसाला घेऊन वर्तविण्यात आलेला अंदाज चुकलेला दिसत आहे. सुरूवातीपासूनच दमदार पाऊस राहणार असे सांगीतले जात असताना वास्तविक पावसाने निराशा केली आहे. आताही २३ ते २६ तारखेदरम्यान वादळीवारा व दमदार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र २५ तारीख निघून गेली तरिही पावसाने हजेरी लावलेली नाही. अशात हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याचे दिसत आहे.

Web Title: During the monsoon sun octane fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.