उड्डाणपूल पोचमार्गावर धुळच धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 09:56 PM2019-02-27T21:56:46+5:302019-02-27T21:57:07+5:30

देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अ‍ॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अ‍ॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. संथगती कामाचा सर्वसामान्य नागरिकांना येथे फटका बसत असून कुणाचेच नियंत्रण येथे दिसत नाही. मागील चार वर्षापासून येथे काम सुरु आहेत.

Dust dust on the flyover route | उड्डाणपूल पोचमार्गावर धुळच धूळ

उड्डाणपूल पोचमार्गावर धुळच धूळ

Next
ठळक मुद्देआजराला खतपाणी : फ्लाय अ‍ॅश मानवी शरीरराकरिता धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी उड्डाणूपल पोचमार्गावर फलाय अ‍ॅश पसरली असल्याने चोवीस तास येथे रस्त्याशेजारी व परिसरात धुळच धुळ सर्वत्र दिसते. आरोग्याला अपायकारक अशी ही फलाय अ‍ॅश असून किमान रस्त्यावर सतत पाणी टाकले जात नाही. येथील वातावरण धोकादायक धुळीमूळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. संथगती कामाचा सर्वसामान्य नागरिकांना येथे फटका बसत असून कुणाचेच नियंत्रण येथे दिसत नाही. मागील चार वर्षापासून येथे काम सुरु आहेत.
तुमसर-गोंदिया राज्य मार्गाला राष्टÑीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. देव्हाडी रेल्वे कॅबीन (फाटक) रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे. चार वर्षापुर्वी येथे प्रत्यक्ष उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोचमार्ग तयार करण्यात आला. त्यानंतर मुख्य उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात करण्यात आली. प्रचंड वाहतुकीमुळे पोचमार्ग काही महिन्यातच खड्डेमय झाला. उड्डाणपूलाच्या भरावात फलॉय अ‍ॅश घालण्यात आली. ती अ‍ॅश पावसाळ्यात पोचमार्ग रस्त्यावर पसरली. सदर फलाय अ‍ॅश स्थानिक नागरिकांकरिता व प्रवाशांकरिता डोकेदुखी ठरली आहे.
सदर महामार्गावर चोवीस तास वाहतुक सुरु असते. या रस्त्याशेजारी व परिसरात प्रचंड धुळ वातावरणात पाहावयास मिळते. वाहनधारकांना पुढील रस्ता दिसत नाही. इतकी धुळ येथील वातावरणात राहते. येथील कंत्राटदार थातुरमातुर रस्त्यावर पाणी घालतो. पाणी वाळल्यानंतर पुन्हा धूळ येथे उडते. ही धुळ आरोग्याला धोकादायक ठरतआहे.
पोचमार्ग बांधकामाला परवानगी
उड्डाणपूलाचे काम अजूनपूर्ण झााले नाही. पोचमार्ग खडडेमय झाल्याने संबंधित विभागाने पोचमार्ग दुरुस्तीकरीता १ कोटी २३ लाखांची निविदा काढली. एका पोचमार्ग येथे दोनदा तयार केला जात आहे. पहिल्या पोचमार्गाचा कार्यकाळ किती होता. उड्डाणपूल बांधकाम करण्याकडेच प्रथम पोचमार्गाची कामे होती. उड्डाणपूल बांधकामाच्या निश्चित कार्यकाळ किती आहे. या संबंधात कुठेच सुचना फलक लावण्यात आले नाही. एकाच पोचमार्गाचे नुतनीकरण येथे दुसऱ्यांदा होत असल्याने प्रश्चचिन्ह उपस्थित होत आहे. उड्डाणपूल बांधकाम पूर्ण होईपर्यंत पोचमार्गाची देखभाल व दुरुस्ती प्रथम पोचमार्ग तयार करणाऱ्या कंत्राटदाराची नाही काय? असे प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

Web Title: Dust dust on the flyover route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.