बांधकामाने धुळीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:00 AM2019-12-07T06:00:00+5:302019-12-07T06:00:23+5:30
राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम सुरु असताना कच्चा रस्त्याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : भंडारा - पवनी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्यस्थितीत सुरु आहे. कोंढा गावाजवळ राज्यमार्ग उखडून येणाऱ्या जाणाºयासाठी व वाहनधारकांना कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नाकातोंडात धूळ जात आहे. परिणामी अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राज्यमार्ग उखडल्यानंतर बाजूला कच्चा रस्ता बांधकाम चांगल्याप्रकारे केले जात नाही. माती, मुरुम टाकून तात्पूरता रस्ता बनविले जाते, पण त्यावर दररोज पाणी मारले जात नाही, या कारणाने रस्त्यावर धुरांचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावर दिवसरात्र प्रचंड वाहतूक असते. महामार्ग चौपदरीकरणाचे बांधकाम सुरु असताना कच्चा रस्त्याची काळजी घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे. पण कंत्राटदाराचे कर्मचारी लक्ष देत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पुलाचे बांधकाम थातुरमातुर
चौपदरीकरणाचे बांधमाकाम करीत असताना मार्गात अनेक नाल्यावर पुल बांधले आहे. यापुर्वी असेलेले पूल तोडून मोठे रुंद पूल बांधण्याचे काम केले जाते. परंतु पुलाचे काम थातुरमातुर केले जात आहे. पुलांच्या बांधकामावर पाणी मारले जात नाही, अशी नागरिकांची ओरड आहे, कोंढा गावाजवळ पाण्याच्या टाकीजवळ पुलाचे बांधकाम केले ते करताना बांधकामावर योग्य पाणी मारले नसल्याने बांधकामास हात लावल्यास सिमेंट रेती खाली पडते, यावरुन बांधकामाचा दर्जा योग्य नाही. रस्त्याचे बांधकाम लवकर पुर्ण करण्याच्या नादात सदर प्रकाराची शक्यता आहे.