महाआवास अभियान ग्रामीण योजनेअंतर्गत ई-गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:31+5:302021-06-17T04:24:31+5:30
लाखांदूर : महाआवास अभियान ग्रामीण योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाअंतर्गत ई-गृहप्रवेशाची सुरुवात पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात ...
लाखांदूर : महाआवास अभियान ग्रामीण योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रमाअंतर्गत ई-गृहप्रवेशाची सुरुवात पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. हा कार्यक्रम १५ जून रोजी स्थानिक लाखांदूर येथील पंचायत समिती सभागृहात पार पडला.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करून घरकुलाच्या गुणवत्ता वाढीसाठी २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान राबविले गेले. त्यानुसार १५ जून रोजी लाखांदूर येथील पंचायत समिती सभागृहात लाभार्थ्यांच्या ई - गृहप्रवेशाचा कार्यक्रम गटविकास अधिकारी जी. पी. अगर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी विस्तार अधिकारी (पंचायत) लंजे , विस्तार अधिकारी (सां) गडमाळे , स्थापत्य अभियंता एस. डी. रंगारी, आर. जे. हेमने, आर. बी. जनबंधू यांसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.