राष्ट्रीय कॅनोईंग ॲण्ड कायकिंग स्पर्धेत १४ पदकांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:45 AM2021-02-25T04:45:24+5:302021-02-25T04:45:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय कॅनोईंग ॲण्ड कायकिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ज्युनियर मुलींच्या संघाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मध्य प्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय कॅनोईंग ॲण्ड कायकिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ज्युनियर मुलींच्या संघाने सहा रजत व आठ कांस्यपदक प्राप्त केली आहेत. महाराष्ट्र निवड समितीचे अध्यक्ष रूपकुमार नायडू तसेच राजेंद्र भांडारकर, डॉ. हेमंत पाटील यांनी या स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड करून हा संघ भोपाळ येथे पाठवला होता. या संघाने उत्तुंग यश संपादन केले आहे. सबज्युनियर मुलींच्या संघाने पाचशे मीटर अंतरात या स्पर्धेत एक रजत तसेच अन्य स्पर्धेत एक कांस्यपदक मिळवले. एकूण सहा रजत व आठ कांस्यपदके मिळवून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कॅनोईंग ॲण्ड कायकिंग खेळात राष्ट्रीय स्तरावर १४ पदके प्राप्त करण्याचा मान भंडारा जिल्ह्याच्या संघाने प्राप्त केला आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे प्रवीण उदापुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, रमेश हजारे, सुभाष जमजारे, शरद सूर्यवंशी, दीपक सोनटक्के, ,विनोद बांते आदींनी कौतुक केले आहे.
बॉक्स
या खेळाडूंमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या सर्वच मुली भंडारा जिल्हा वॉटर स्पोर्ट्स अकादमीच्या आहेत. या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून गणेश मोहोळकर तर संघाच्या व्यवस्थापक म्हणून प्रणाली तरारे यांची निवड करण्यात आली होती.