जिल्ह्यातील ५२ रेतीघाटांचा लिलावाचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:44+5:302020-12-31T04:33:44+5:30

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ...

Easy way to auction 52 sand dunes in the district | जिल्ह्यातील ५२ रेतीघाटांचा लिलावाचा मार्ग सुकर

जिल्ह्यातील ५२ रेतीघाटांचा लिलावाचा मार्ग सुकर

Next

तुमसर : बावनथडी वैनगंगा नदी पात्र रीतीने समृद्ध आहे मागील दोन वर्षापासून रेतीघाटांचा लिलाव प्रक्रिया रखडली होती परंतु जिल्ह्यातील ५२ रेती घाटांची लिलाव प्रक्रियेला शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. तुमसर तालुक्यातील सात ते आठ रेती घा टांचा त्यात समावेश असल्याची माहिती आहे.

बावनथडी व वैनगंगा नदी रेती घा टा करिता प्रसिद्ध आहे मागील दोन वर्षांपासून येथील लिलाव प्रक्रिया रखडली होती. पर्यावरणाच्या येथे हित लक्षात घेण्यात आले होते. शासनाने यावर बंदी आणली होती. पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शेतीला ग्रामीण व शहरी भागात मोठी मागणी आहे अनेक बांधकामे यामुळे रखडली होती विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून शासनाने नियमानुसार रेती घाट लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. खनिकर्म विभाग महसूल प्रशासन व पर्यावरण यांच्या अंतिम निर्णयानुसार रेती घाट लिलावाला हिरवी झेंडी देण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणात रेती चोरी: रेती घाटांचे लिलाव नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी करण्यात आली मागील दोन वर्षात नदीपात्र पोखरून काढण्यात आले. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते बावांथाडी वैनगंगा नदीच्या सीमा मध्य प्रदेशाला लागून आहेत त्यामुळे मध्यप्रदेशातील रेती तस्करांनी महाराष्ट्राच्या सिमेतील मोठ्याप्रमाणात रेतीचे उत्खनन केले आहे यामुळे राज्याचे महसूल मोठ्या प्रमाणात बुडले. आजही रेतीची चोरी सुरूच आहे शासनाने रेती उत्खननावर बंदी आणली होती परंतु रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचे नियमबाह्य उत्खनन केले.

बॉक्स

रेती चोरीला बसणार आळा

रेतीघाटांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे रेती चोरी ला आळा बसेल व शासनाला महसूल मिळेल सध्या बावनथडी व वैनगंगा नदी पात्रात मुबलक रेतीसाठा उपलब्ध आहे. येथील पांढरेशुभ्र दाणेदार रेती दर्जेदार आहे या रे तिला शहरात बांधकामाकरिता प्रथम पसंती देण्यात येते त्यामुळे तिला मोठी मागणी आहे दररोज शेकडो ट्रक रेती शहराकडे जाते. नदीपात्रातील रेती उत्खनन केल्याने अनेक गावांना धोका वाढला आहे.त्यामुळे लिलाव झालेल्या नदीपात्रातून नियमानुसार रेतीचे उत्खनन करण्याची गरज आहे याकरिता महसूल विभागाची पथके तैनात करण्याची गरज आहे. ज्यामुळे नदीचे अस्तित्व कायम राहील.

Web Title: Easy way to auction 52 sand dunes in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.