निसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या खा आणि निरोगी राहा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:40 AM2021-08-12T04:40:05+5:302021-08-12T04:40:05+5:30

भंडारा : मानवी आहारात प्रामुख्याने अनेक भाज्यांचा समावेश होतो. धान्य, कडधान्यानंतर मानवी आहारात विविध भाज्यांचा समावेश होतो. आपल्या ...

Eat naturally growing legumes and stay healthy .... | निसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या खा आणि निरोगी राहा....

निसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या खा आणि निरोगी राहा....

Next

भंडारा : मानवी आहारात प्रामुख्याने अनेक भाज्यांचा समावेश होतो. धान्य, कडधान्यानंतर मानवी आहारात विविध भाज्यांचा समावेश होतो. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंदमुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ हजार प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांना मागणी वाढत चालल्याने रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होत आहे. संपूर्ण जगभरात वनस्पतींच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १,५३०पेक्षा अधिक वनस्पती, भाज्यांचा दैनंदिन आहारात वापर करतात. जिल्ह्यात पावसाळ्याच्या दिवसात जंगलात, डोंगरात, शेतशिवारात उगवणाऱ्या रानभाज्या या मानवी शरीरासाठी फार आवश्यक आहेत. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. शिवाय शेतकऱ्यांना यामुळे रोजगारही मिळतो.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का ....

१) पाथरी -

पाथरीची भाजी जिल्ह्यात आजही मिळते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली, वरोरा, सिंदेवाही परिसरात या भाजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पाथरीची भाजी बनवताना चिरलेली भाजी उकडून, शिजवून घ्यावी. डाळ, दाणे घालून फोडणी देताना दोन हिरव्या मिरच्या टाकून त्या एकत्र ढवळून एकजीव करावी. भाजीत थोडासा आंबटपणा येण्यासाठी ताक किंवा थोडासा गूळ घालून भाजी करता येते.

२) कुरडूची भाजी ...

कुरडूची पाने ही तुळशीच्या पानाएवढी असतात. ही भाजी शक्यतो ऑगस्ट, सप्टेंबरच्या कालावधीत चांगली वाढते. कुरडूची भाजी आजही मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येते. कुरडूची पाने, बियाही उपयुक्त असतात.

३) आघाडा-

आघाड्याची कोवळी पाने बेलाच्या झाडाप्रमाणे शेंड्याकडे निमुळती असतात. आघाड्याची कोवळी पाने, बिया उपयुक्त आहेत. आघाड्याची पाने तोडून त्यामध्ये लसूण, कांदा, डाळीचे पीठ, फोडणीचे साहित्य घेऊन भाजी चिरून धुवून घ्यावी. लसणाच्या पाकळ्या तेलात टाकून भाजी करावी.

४) घोळ भाजी-

घोळ भाजी ही साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत आढळते. जिल्ह्यात दिवाळीनंतर

रब्बी हंगामात ही भाजी विक्रीसाठी येते. अनेकदा भाजीपाला पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहजरित्या उगवते.

५) भुई आवळा-

भुई आवळ्याची पाने अतिशय नाजूक म्हणजेच शेवग्याच्या पानांपेक्षा लहान असतात. भुई आवळ्याची स्वच्छ केलेली दोन वाट्या भाजी, अर्धी वाटी तूर, मसूर किंवा मूग डाळ, दाण्याचे कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, लसूण टाकून कुकरमध्ये लसूण टाकून शिजवून नंतर फोडणी द्यावी.

या भाज्या झाल्या दुर्मीळ

१) केना-

केनाची भाजी आज दुर्मीळ होत आहे. शक्यतो पावसाळ्याच्या कालावधीतच ही भाजी मिळते. स्थानिक नाव केना. ही भाजी आज दुर्मीळ होत आहे. भाजी कापून तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, जीरा, केना भाजी कापून तांदळाचे पीठ, कांदा, मिरची, जिरे, लाल तिखट, हळद, टोमॅटो, कोथिंबीर टाकून आवश्‍यकतेनुसार पाणी टाकून ही भाजी बनवता येते. केनाचे थालीपीठही बनवले जाते. कालावधीतच ही भाजी मिळते. स्थानिक नाव केना आहे.

२) कपाळफोडीची भाजी

चंद्रपूर जिल्ह्यात कपाळफोडीच्या भाजीला स्थानिक नाव फोफांडा आहे. वेलवर्गीय ही भाजी असून, त्याच्या पानांची भाजी करतात. सेपिडीएसी या कुळातील ही भाजी आहे. कपालफोडीची पाने तोडून तेल, कांदा, मिरची, जिरेे, तिखट, मीठ, हळद, मीठ, कोथिंबीर, टोमॅटो, टाकून ही भाजी बनवतात.

३) खापरफुटीची भाजी

स्थानिक नाव खापरफुटी या नावानेच ही भाजी ओळखली जाते. याची पाने तोडून तेल, कांदा, लसूण, मिरची, हळद, टोमॅटो, कोथिंबीर टाकून बनवतात. सर्वप्रथम भाजी धुवून तेल गरम करून कांदा फोडणी देऊन सर्व साहित्य टाकून शिजवून नंतर कोथिंबीर टाकावी.

कोट

डोंगर, जंगल, शेतशिवारात उगवलेल्या या रानभाज्यांवर कोणत्याही कीटकनाशकांची फवारणी केलेली नसते. त्यामुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे आहारात विशेष महत्व आहे. शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, त्यांचे औषधी गुणधर्म सर्वांना माहिती व्हावेत. या हेतूने कृषी विभागातर्फे ९ ऑगस्ट २०१९पासून रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

मिलिंद लाड,

उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

Web Title: Eat naturally growing legumes and stay healthy ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.