गायमुख यात्रेला कोरोनाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:02+5:302021-03-10T04:35:02+5:30
तुमसर: सातपुडा पर्वत रांगातील लहान महादेव म्हणून प्रसिद्ध गायमुख यात्रेला यंदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. प्रशासनाने यात्रेला स्थगिती दिली ...
तुमसर: सातपुडा पर्वत रांगातील लहान महादेव म्हणून प्रसिद्ध गायमुख यात्रेला यंदा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. प्रशासनाने यात्रेला स्थगिती दिली असून हर हर महादेवच्या गजराला ब्रेक लागला आहे. पूर्व विदर्भातून व मध्यप्रदेशातून लाखो भाविक या यात्रेला आवर्जून उपस्थित राहायचे. यात्रा स्थगितीमुळे लाखोंची उलाढाल ठप्प पडणार आहे.
यात्रेच्या पाच ते सहा दिवसापासून भक्तांचे पोहे येथे येत होते. सुमारे पाच दिवस यात्रा चालत होती. कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. ११ मार्च ते १५ मार्चपर्यंत या ठिकाणी गर्दी करता येणार नाही असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गायमुख मंदिर परिसरात सामसूम दिसत आहे. भाविक यात्रेला उपस्थित राहायचे यात्रेमध्ये पूजेचे साहित्य, खेळणी, सौंदर्यप्रसाधने व उपयोगी वस्तू, कपड्यांची दुकाने, हॉटेल्स, फळांची दुकाने, रसवंती, खानावळ आदी दुकाने लावली जात होती. लाखोंची उलाढाल व्हायची. काहींना रोजगार प्राप्त होता. परंतु यात्रा बंदमुळे सर्व व्यवहार या ठिकाणी ठप्प पडणार आहे.
यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त राहायचा यावेळी सुद्धा पोलीस प्रशासनाची येथे करडी नजर राहणार आहे. सर्वधर्म समभावाचे एक प्रतीक मानले जाते. निसर्ग रम्य परिसरामध्ये हे मंदिर असून हा संपूर्ण परिसर जंगल व्याप्त आहे. राज्य शासन व भंडारा येथील पांडे यात्रेचे आयोजन करतात. विविध राजकीय सामाजिक संस्था येथे महाप्रसादाचे वितरण करायचे.
बॉक्स
पाणी वितरणाची परंपरा
चाळीस वर्षांपूर्वी यात्रेदरम्यान पाणी टंचाई निर्माण झाली होती. ती दूर करण्याकरता खापा येथील प्रभाकर वाडीभस्मे यांनी यात्रेकरूंना पाणी उपलब्ध करून दिले होते. दरवर्षी यात्रेत पाणी पुरवठा करण्याची परंपरा त्यांनी जोपासली होती. त्यांच्या नंतर त्यांचे कुटुंबीय दरवर्षी यात्रेत पाणीपुरवठा करतात.
चांदपूर मंदिर लॉक डाऊन
सिहोरा परिसरातील चांदपूर येथे जागृत हनुमानाचे मंदिर आहे. मंदिर प्रशासनाने ११ मार्च ते १५ मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दी वाढू नये कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता येथे हा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.