पर्यावरणपूरक! भंडारा जिल्ह्यात एसटीच्या ५५ बस विजेवर धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 08:00 AM2021-08-31T08:00:00+5:302021-08-31T08:00:17+5:30

Bhandara News कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. भंडारा विभागात अशा ५५ बस विजेवर धावणार आहेत.

Eco-friendly! In Bhandara district, 55 ST buses will run on electricity | पर्यावरणपूरक! भंडारा जिल्ह्यात एसटीच्या ५५ बस विजेवर धावणार

पर्यावरणपूरक! भंडारा जिल्ह्यात एसटीच्या ५५ बस विजेवर धावणार

Next
ठळक मुद्दे भंडारा विभागाने वरिष्ठांकडे पाठविला प्रस्ताव, डिझेलच्या खर्चात होणार बचत

ज्ञानेश्वर मुंदे

लोकमत न्यूज नेटवर्क  

भंडारा : कोरोनाचे संकट आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळ आर्थिक अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आता इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. भंडारा विभागात अशा ५५ बस विजेवर धावणार आहेत. पर्यावरणपूरक वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या निकाली निघेल. तसेच डिझेलच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे. (Eco-friendly! In Bhandara district, 55 ST buses will run on electricity)

इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटरसायकल, ई-रिक्षांसोबतच आता महामंडळाच्या बसही धावणार आहेत. या बस सहा महिन्यांनंतर सेवेत रुजू होतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी माहिती संकलित केली जात आहे.

या मार्गावर धावणार बस

अद्यापल इलेक्ट्रिक बस प्रस्तावित असून, त्या नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार याचे नियोजन करण्यात आले नाही. मात्र, भंडारा-नागपूर, भंडारा-गोंदिया, भंडारा-तुमसर, भंडारा-पवनी या विभागांतर्गत मार्गावर सुरुवातीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर या बस धावतील, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली. या बसची महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही उत्सुकता लागून आहे.

आणखी सहा महिने लागणार

वरिष्ठ स्तरावरून भंडारा विभागातून यासंदर्भात माहिती मागविण्यात आली असून, भंडारा विभागातील ५५ बसची माहिती पाठविण्यात आली आहे. मात्र, सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी या बस रस्त्यावर धावण्यास लागणार आहे. कारण या बसची खरेदी, त्यासाठी लागणारे चार्जिंग सेंटर याची निर्मिती करावी लागणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून इलेक्ट्रिकवर बस चालविण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासाठी आता चाचपणी सुरू असून लवकरच या बस भंडारा विभागातही धावतील.

कोठे होणार चार्जिंग सेंटर

इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या बससाठी चार्जिंग सेंटरची निर्मिती करावी लागणार आहे. सध्या ही योजना प्राथमिक स्तरावरच आहे. त्यामुळे नेमके चार्जिंग स्टेशन कुठे राहणार याबाबत निश्चत नाही; परंतु भंडारा विभागात असलेल्या आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उघडले जाणार आहे. डिझेल जसे आगारातच मिळते त्याच पद्धतीने चार्जिंगही केले जाणार आहे.

 

वरिष्ठस्तरावरून इलेक्ट्रिक बसबाबत माहिती मागविण्यात आली. भंडारा विभागातून ५५ बसचा प्रस्ताव पाठविण्यात आला. याचा फायदा महामंडळासोबतच प्रवाशांनाही होणार आहे. पर्यावरणपूरक वाहनांमुळे प्रदूषणाची समस्याही कमी होईल.

- डॉ. चंद्रकांत वडसकर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.

Web Title: Eco-friendly! In Bhandara district, 55 ST buses will run on electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.