पर्यावरणपूरक शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:16 PM2017-10-23T23:16:41+5:302017-10-23T23:17:00+5:30

शेतकºयांनी कृषीसंबंधी शासनाच्या योजनांचा पुरेपूर फायदा घेऊन विषमुक्त शेती करुन आर्थिक उत्थान करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (कृषी) डॉ. के. पी. वासनिक यांनी केले

Eco-friendly farming | पर्यावरणपूरक शेती करा

पर्यावरणपूरक शेती करा

Next
ठळक मुद्देके.पी.वासनिक : सेंद्रीय शेतीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : शेतकºयांनी कृषीसंबंधी शासनाच्या योजनांचा पुरेपूर फायदा घेऊन विषमुक्त शेती करुन आर्थिक उत्थान करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (कृषी) डॉ. के. पी. वासनिक यांनी केले.
तालुक्यातील सेंद्रिय शेती पाहणी दौरा कार्यक्रमप्रसंगी रोहणी येथे आयोजित सभेत शेतकºयांना संबोधित करताना ते बोलत होते. तालुक्यातील रोहणी, कुडेगाव व सोनी येथील तीन गट मार्फत १५० एकर शेती कृषी विभाग लाखांदूर मार्फत परंपरागत सेंद्रिय शेती योजनेला कृषी मंत्रालय, भारत सरकारचे अतिरिक्त आयुक्त(विस्तार) डॉ.के.पी.वासनिक यांची क्षेत्रिय भेट दौरा कार्यक्रम शुक्रवारला घेण्यात आला. यावेळी सोनी,कुडेगाव व रोहणी येथील सेंद्रिय शेती योजना राबविणाºया शेतकºयांची भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये माती परीक्षण, पीक प्रात्यक्षिक, गांडूळ खत उत्पादन युनिट, बिडी कंपोस्ट, दशपर्णी अर्क, जीवामृत, अमृतपाणी, निम्बोळी पावडर मशीन, गटांना कॉम्प्युटर आदींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर रोहणी येथील गुरुदेव सेवा मंडळ आश्रमात सभा घेण्यात आली.
यावेळी डॉ. वासनिक यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले. शेतकºयांनी शेतीविषयक शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. आपण परंपरागत शेती करतो परंतु अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातून आपला उत्पन्न कसा वाढेल, याकडे लक्ष द्यावे. आज शेतीमधून आपण अधिक रासायनिक खतांचा वापर करीत असल्याने आपल्याला पौष्टीक अन्न मिळत नाही. त्यामळे अनेक रोगांचे प्रादुर्भाव मानवी शरीरावर होतो. त्यामुळे पर्यावरण पूरक शेतीकडे वळावे. विषमुक्त शेतीचा अवलंब करावा व शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.के.पी.वासनिक यांनी उपस्थितांना केले.

Web Title: Eco-friendly farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.