कारले पिकातून आर्थिक उन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2016 12:53 AM2016-05-05T00:53:14+5:302016-05-05T00:53:14+5:30
एकीकडे शेतकरी संकटात असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. दुसरीकडे काही शेतकरी निराश न होता परिश्रम, पिकांचे योग्य नियोजन,
लोकमत शुभवर्तमान : २ एकरात १३ लाखांचे उत्पन्न
भंडारा : एकीकडे शेतकरी संकटात असल्याचे चित्र आपण पाहत आहोत. दुसरीकडे काही शेतकरी निराश न होता परिश्रम, पिकांचे योग्य नियोजन, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर, ठिंबक सिंचनचा योग्य उपयोग करून शेतातून पीक घेत आहेत. निलज येथील या शेतकऱ्याने कारले या पिकाच्या उत्पादनातून वर्षाला १३ लाख रूपयांचा नफा कमावला आहे.
पवनी तालुक्यातील निलज येथील नरेश ढोक या तरूण शेतकऱ्याने धान उत्पादनाला फाटा देत भाजीपाला लागवड केली. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांचे वडील रामचंद्र ढोक धानाचे पीक घेत होते. दहा वर्षापूर्वी नरेशने विंधन विहिर तयार केली. सिंचनाची सुविधा होताच भाजीपाला लागवड केली. याशिवाय ५ एकर शेती बटईने करतात. ही शेती त्यांनी ठिंबक सिंचनाखाली आणली. यावर्षी नरेशने २ एकर शेतीत ६२०७ या वाणाची लागवड केली. पहिले कारल्याचे पीक आॅगस्टमध्ये घेतले. पाण्याचा कमी वापर आणि पीक व्यवस्थापनासाठी त्यांनी मल्चिंगचा वापर केला. यासाठी ४१ हजार रूपये खर्च आला. कमी पाण्यात जास्त पीक घेण्यावर त्यांचा भर असतो. पाणी वाचले तर आणखी नियोजन करता येते, असे ते सांगतात. (प्रतिनिधी)