ग्रामीण नागरिकांची आर्थिक होरपळ

By Admin | Published: November 16, 2016 12:42 AM2016-11-16T00:42:55+5:302016-11-16T00:42:55+5:30

शेतकरी, शेतमजूरांना दैनंदिन खर्चाकरिता सुट्या नोटांचा पडलेला अडथळा मोठा त्रासदायक ठरत आहे.

The economic velocity of rural citizens | ग्रामीण नागरिकांची आर्थिक होरपळ

ग्रामीण नागरिकांची आर्थिक होरपळ

googlenewsNext

भाजीपाला, किराणा, चहा टपऱ्यांचा व्यवहार ठप्प : पैशासाठी सर्वांची केविलवाणी धडपड
पालांदूर : शेतकरी, शेतमजूरांना दैनंदिन खर्चाकरिता सुट्या नोटांचा पडलेला अडथळा मोठा त्रासदायक ठरत आहे. जिल्ह्यात धान कापणी, बांधणी, मळणी विक्रीचा हंगाम जोरात आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजूरवर्गाला सुट्या नोटांकरिता दाहीदिशा भटकावे लागत आहे. बँकेत रांगेत राहून सुटे नोटा घेणारे मध्यमवर्गीय सामान्यांना जवळही भटकू देत नाही. सुटे नोट मागितले तर २००० ची नवी करकरी नोट दाखवून चूप करतात.
बँकेतही कर्मचारीगण पूर्ण सेवेने सेवा पुरवित नाही. १००० व ५०० रूपयाच्या नोटा स्वीकारीत त्यांच्याच हिशेब सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी लवकरच हिशेब मागतात, असे बोलून ४ वाजेपर्यंत व्यवहार करतात. त्यामुळे आम आदमी खूपच त्रासला असून लहान व्यापार ठप्प पडले आहेत. ज्यांच्या घरी लग्न, तेरवीचे कार्यक्रम आहेत, अशांची मोठी तारांबळ उडाली आहे. नातेवाईकांकडे फोन करून शक्य तितक्या १०० च्या नोटा मिळवा, जुळवा व पाठवा असा संदेश सुरु आहे.
मोदींच्या एका ‘स्ट्राईक’ने देशाला अविस्मरणीय पंतप्रधान दिले आहे. मोदींचा हेतू प्रामाणिक आहे. फक्त तो सिद्ध करण्याकरिता पूर्वतयारीची कमतरता जाणवत आहे. एवढा मोठा निर्णय घेण्याअगोदर पुरेशा लहान नोटांची व्यवस्था झाली असती तर गरीब माणूस प्रभावित झाला नसता. ग्रामीण भागात आजही बऱ्याच कुटुंबांनी बँकेचे तोंडसुद्धा पाहीले नाही. मिळकतीतून बचत करून घरात जमा करण्याची पुर्वापार परंपरा आजही कायम आहे.
बँक सरळ, सुरळीत सेवा पुरवित नाही. आपलाच पैसा आपल्याच वेळेवर कामाकरिता मिळत नसल्याची बोंब सामान्यांकरिता नवीन नाही. आमच्या माय माऊलींची बचत मोदींनी आज उघड करायला भाग पाडले. विदेशापेक्षा आमची संस्कृती महान असल्यामागे आमची भगिनींचा सिंहाचा वाटा आहे.
दैनंदिन उत्पन्नातून बचत करून मुला-बाळांना शिक्षण किंवा आरोग्याकरिता ही बचत मोठ्या कामाची होती. मात्र आता मोदी साहेबांच्या एका स्ट्रोकने आमची चार भिंतीतीतील बचत उगागर करीत बँकेत जाण्यास भाग पाडले. यामुळे गरीब जनता जाम नाराज आहे.
ज्या ध्येयाने मोदींनी १००, ५०० च्या नोटा कालबाह्य समजत एका रात्रीत धाडसी निर्णय घेत देशवासीयांना अचंबित केले. त्याचे चांगले वाईट परिणामांची चर्चा चालू आहे. विरोधकांनी बुधवारपासून होणाऱ्या अधिवेशनात धारेवर धरण्याचे बेत आखले आहे. राजकारणी तर खरा पैशावाला हाही चर्चेत नाही. मग सामान्यालाच का फटका? म्हणत १०००, ५०० च्या नोटा दैनंदिन चर्चेत आहेत. (वार्ताहर)

नवी नोट फायद्याची ?
काळा पैसा रोखण्याकरिता जुन्या नोटांवर बंदी घालून दोन हजाराची नवीन नोट चलनात आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय भ्रष्टाचारी आणि काळा पैसा जमविण्याचा सोयीचा ठरत असल्याची टीका होत आहे. लाच खोरीकरिता दोन हजाराची नोट अधिक सोयीची ठरत असल्याने भ्रष्टाचार फोफावेल असे समाजातून पुढे आले आहे.

संतप्त नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया
सामान्य खेड्यातील लोकांना नाकीनऊ आणले आहे. मोदी सरकार गोड बोलून भाऊक होऊन मन जिंकतो. पण याने आमची नाराजी वाढली आहे. रोजच्या गरजांना लहान नोटांची व्यवस्थाच बँकेत नसल्याने बाजारातून भाजीपाला, किराणा घेवाले मोठी अडचण तयार झाली. गर्दीत उभा राहिल्यावरही लहान नोटा देतील हे निश्चित नसल्याने घोर निराशा सरकार केली. सरकार आमच्यासाठी की आम्ही सरकारसाठी हे समजत नाही. रांगेत उभा राहून थकलो, पण पैसा काही भेटत नाही.
बाळकृष्ण शेंडे, मेंगापूर व प्रकाश देशपांडे, जेवनाळा
शासनाने आमची चहूबाजूने अडचण केली आहे. मोठ्या बँका खेड्यात नसल्याने सहकारी बँका म्हणजे आम्हा शेतकऱ्यांच्या हक्कांच्या बँका आहेत. यांच्यात मोठ्या नोटा नकारून आमच्या दैनंदिन व्यवहारावर कुऱ्हाडच मारली आहे. हे न्याय नितीला धरून नाही. लहान नोटा तरी पाठवायला पाहिजे होते. परंतु नियोजनाअभावी ग्रामीण मोठ्या अडचणीत उभे केले आहे. भ्रष्टाचार थांबवण्याकरिता २००० ची नोट न छापता लहान लहान नोटा आम्हाला पुरवा अशी मागणी आहे.
रमेश पराते पालांदूर प्रगत शेतकरी

Web Title: The economic velocity of rural citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.