शिक्षण हे विकासाचे केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:54 AM2021-01-08T05:54:10+5:302021-01-08T05:54:10+5:30
कोंढा-कोसरा : शिक्षण हे विकासाचे केंद्रबिंदू असून ते मुलींना देणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले यांनी ते मुलींना ...
कोंढा-कोसरा : शिक्षण हे विकासाचे केंद्रबिंदू असून ते मुलींना देणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले यांनी ते मुलींना दिल्याने मुलींचा विकास घडून आला, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिवस म्हणून मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲड. आनंद जीभकाटे उपस्थित होते. सत्कारमूर्ती रेखाताई भुसारी, सरपंच नूतन कुझेकर, ज्योती पुरुषार्थी, नीता रामटेके, ममता जांभूळकर, विजय भुरे, एम जी . देशमुख, सुदाम खंडाईत, प्राचार्य डी. एस. चेटुले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच कोंढा पंचक्रोशीतील प्रतिष्ठित महिला मंडळी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी या दिनाचे औचित्य साधून सर्वप्रथम वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील कर्तबगार महिला रेखाताई भुसारी, नूतन कुझेकर, ज्योती पुरुषार्थी यांचा संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष ॲड. आनंद जीभकाटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एकांकिका, रांगोळी स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, एकपात्री नाट्यप्रयोग आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. आनंद मेळावा याचे आयोजन करून विद्यार्थ्यांना खरी कमाई कशी करायची याचे धडे विद्यार्थी जीवनापासून देण्याचा हेतू होता. अध्यक्षीय मार्गदर्शनातून जे इतिहास वाचतात तेच इतिहास घडवितात. प्रास्ताविक एम.बी. मेश्राम यांनी तर संचालन एस. जे शंभरकर यांनी केले. आभार प्राचार्य डी.एस. चेटुले यांंनी मानले.