स्वबळासाठी उभे राहण्याचे शिक्षण महत्त्वाचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:00+5:302021-01-04T04:29:00+5:30
मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून रविवारी साजरी करण्यात ...
मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून रविवारी साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक राजकुमार बांते, विद्यार्थिनी जान्हवी भोंगाडे, राजश्री बुधे, शोभा कोचे, हंसराज भडके, हेमराज राऊत, गजानन वैद्य, गोपाल मडामे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे उपस्थित होते.
यावेळी अभिलाषा भडके, छबिता भोयर, मोनाली गलबले, जान्हवी भोंगाडे, राजश्री बुधे, शोभा कोचे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाळेच्यावतीने सरपंच सत्यफुला लेंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शाळेच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर निबंध लेखन स्पर्धा तसेच स्त्री शिक्षणाचे महत्व व सावित्रीबाई फुले या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत छबिता भोयर, विशाल आंबिलकर, सेजल शिवणकर, साहिल मेश्राम व वक्तृत्व स्पर्धेत अभिलाषा भडके, मोनाली गलबले, जान्हवी भोंगाडे यांनी पुुरस्कार पटकाविले. विजेत्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. गोपाल मडामे यांनी परीक्षण केले. हेमराज राऊत यांनी प्रास्ताविक केले. राजू बांते यांनी सूत्रसंचालन केले. शिवानी भोंगाडे यांनी आभार मानले.