जीव मुठीत घेऊन शैक्षणिक प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 10:51 PM2018-05-22T22:51:53+5:302018-05-22T22:51:53+5:30
बस स्थानकावर असलेल्या असुविधा व पडकी इमारत हि प्रवाशाच्या गैरसोयीचे माध्यम आहे. वेळापत्रकानुसार बस धावत नसल्याने शेकडो प्रवाशी खासगी साधनाचा वापर करतात. प्रवाशी असूनही बस थांबत नसल्याने त्रस्त शेकडो विध्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : बस स्थानकावर असलेल्या असुविधा व पडकी इमारत हि प्रवाशाच्या गैरसोयीचे माध्यम आहे. वेळापत्रकानुसार बस धावत नसल्याने शेकडो प्रवाशी खासगी साधनाचा वापर करतात. प्रवाशी असूनही बस थांबत नसल्याने त्रस्त शेकडो विध्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागते. शालेय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवाशाबरोबर मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांसाठी होणारी फरफट ही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतेचे परिणाम आहे.
वरठी येथून भंडारा, मोहाडी व तुमसर सारख्या शहरात शिक्षणासाठी ५०० च्या वर विध्यार्थी प्रवास करतात. त्याबरोबर येथे शिक्षणासाठी येणाºया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. नागपूर- गोंदिया महानगरात शिक्षणासाठी वरठीसह परिसरातील इतर गावातील विध्यार्थी व नोकरी निमित्त जाणाºयांची संख्या जास्त आहे. त्यानुसार बस स्थानकावर सुविधा उपलब्ध नाहीत. गावाचे विस्तारलेल्या भागामुळे काही भागातील विध्यार्थ्यांना बस स्थानक दूर तर काही विध्यार्थ्यांना जवळ होते. अशा परिस्तिथी गावात येणाºया बसेस ची संख्या प्रवाशाच्या तुलनेत कमी पडत आहे. बस स्थानक दूर पडत असलेल्या भागातील शेकडो प्रवाशी हे बस स्थानक ते जगनाडे चौक रस्त्यावर उभे राहून बस पकडतात. रेल्वे स्टेशन पलीकडे राहणारे विध्यार्थी व प्रवाशी हे पाचगाव फाट्यावर असलेल्या प्रवाशी थांबा व काही सनफ्लॅग गेट जवळील बस स्थानकावरून बसेस पकडतात.
विध्यार्थी व नोकरी धारकांना वेळेचे बंधन असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत प्रवास करणे बंधनकारक ठरते. सकाळी ६ वाजे पासून ते ११ वाजेपर्यंत बस स्थानक व गांधी वार्ड, हनुमान वॉर्ड स्थित प्रवाशी निवारे आणि रस्त्यावर प्रवाशांसह विद्यार्थ्यांची गर्दी पाहावयास मिळते. सायंकाळी परतीच्या प्रवाशांसाठी सारखी गर्दी उतरते. नेमका या काळात या मार्गावरून धावणाºया बसेसची संख्या प्रवासाच्या तुलनेत कमी आहे. लांब पल्ल्याचे एस टी बसेस फुल्ल धावत असल्याने प्रवाशांना न घेता भुर्रकन निघून जातात.
कोणत्याही परिस्थिती शालेय वेळ सांभाळताना विद्यार्थ्यांची फरफट होते. बस पकडण्यासाठी अक्षरश विध्यार्थी बसच्या मागे धावत सुटताना दिसतात. बस पकडण्यासाठी विध्यार्थ्यांना करावी लागणारी धडपड जीवघेणी आहे. भर रस्तावर उभे राहून शाळा पकडण्यासाठी होणारी सर्कस व घरी परताना पुन: करावी लागणारी कसरत मनस्ताप व यातना देणारी आहे. याबाबद लोकप्रतिनिना कल्पना आहे. अनेक पालक न नागरिकांनी याबाद लोकप्रतिधींकडे साकडे घातले आहेत. पण भावना शून्य लोकप्रतिनिधींना त्यांचे मूल शिकत नसल्यामुळे परिणाम पडताना दिसत नाही.
जिल्ह्याच्या नकाशात मनाचे स्थान असणारे वरठी हे गाव लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षतेचे प्रतीक आहे. सत्ताधार्यांना रस्ते नाल्यापलीकडे विकास सुचत नाही. विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी कोमात गेल्यासारखे आहेत. गावातील व्यवस्था व सुविधा याबाद उत्कृष्ठ परिणाम पाहिजे असल्यास सत्ताधारी यांच्या पेक्षा विरोधी पक्ष मजबूत पाहिजे. पण वरठी येथील राजकारण व्हिजनशून्य असल्याने गावाची पुरती वाट लागली आहे. गावातील विध्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागणार प्रवेश संपणार नसल्याचे संकेत दिसत आहेत.