जिल्ह्यात ईद ए मिलाद उत्साहात
By Admin | Published: December 25, 2015 01:37 AM2015-12-25T01:37:44+5:302015-12-25T01:37:44+5:30
मुस्लीम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जश्ने ईद ए मिलाद निमित्त शहरातून रॅली काढण्यात आली.
हजरत मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिवस : विविध ठिकाणी काढण्यात आली मिरवणूक
भंडारा : मुस्लीम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जश्ने ईद ए मिलाद निमित्त शहरातून रॅली काढण्यात आली.
मोहाडी : मोहमंद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त गावातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीत उपस्थित लोकांना खाऊंचे वाटप करण्यात आले. डॉ. प्रशांत थोटे यांच्यातर्फे रॅलीचे स्वागत करुन मिठाई वितरीत करण्यात आली. सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविण्यात आले. याप्रसंगी मौलाना अब्दुल करीम, मुनवर पठाण, इसराईल शेख, फिरोज शेख, सलीम शेख, युसुफ शेख, जुबैर शेख, नईम कुरेशी, रज्जाक पठाण, हसरत शेख, अनवर पठाण, बबलु सैय्यद, बबलु शेख, अफरोज पठाण, शोयेब शेख, इशु शेख, वैज शेख, मुन्नु पठाण आदी उपस्थित होते.
पवनी : हजरत मोहमंद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त येथील मुस्लिम बांधवानी जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी साजरी करण्यात आली याप्रसंगी सकाळी ९ वाजता जामा मशिदीतून मिरवणूक काढण्यात आली. रॅली मुख्य मार्गानी गौतम वॉर्ड कानीपुरा विठ्ठल गुजरी चौक, घोडेघाट चौक, तुकडोजी महाराज चौक, आंबेडकर चौक, सराफा लाईन, अहीरपुरा चौक, गांधी चौक, इमली चौक, बाजार चौक, नगर परिषद चौक, गांधी भवन व भाईतलाव वार्डची परिक्रमा घालून रॅलीचा समारोप जामा मस्जिद येथे फातेहाखानी करुन करण्यात आले. रॅलीमध्ये विविध ठिकाणी शरबत, बुंदी, खीर, पोहयाचे वाटप करण्यात आले. यावेळी अंजुमन अरबी मदरसा, भाईतलाव इज्तेभाई कमेटी, काजीपुरा इज्तेभाई कमेटी, घोडेघाट इज्तेभाई कमेटीचे विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी नारे लावले. कार्यक्रमासाठी सिरातुजबी कमेटी, अंजुमन अरबी मदरसा कमेटी, सोमवारी अहीरपुरा इजेत्माई कमेटी, घोडेघाट मस्जिद कमेटी, काजीपुरा कमेटी यांनी सहकार्य केले.
जवाहरनगर : मोहम्मद पैगंबर यांचे जन्म दिन हा जश्न-ईदे-मुलान्नुदिन म्हणून मोठया उत्साहात ठाणा पेट्रोलपंप येथे सुन्नी जामा मस्जीद व नुरा मस्जीद यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन केले. महात्मा गांधी वार्ड मधून रॅलीचे प्रारंभ झाले. महात्मा फुले वार्ड, हनुमान वॉर्ड, विवेकानंद कॉलोनी, राष्ट्रीय महामार्ग ठाणा टी-पार्इंट मार्गे सुन्नी जामा मस्जीद येथे रॅलीचे समापन झाला. ठिकठिकाणी शरबत, अल्पोपोहार, सहभोजन वितरीत केले. (लोकमत चमू)