रानडुकराच्या हल्ल्यात आठ शेतमजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:43 PM2018-07-30T22:43:54+5:302018-07-30T22:44:42+5:30
शेतात धानाची रोवणी करतांना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आठ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हसारा शिवारात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये सहा महिला मजुरांचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Next
ठळक मुद्देहसारा शिवारातील घटना : सहा महिलांचा समावेश, दोघांची प्रकृती गंभीर
<p>लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतात धानाची रोवणी करतांना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात आठ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील हसारा शिवारात सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये सहा महिला मजुरांचा समावेश असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
उत्तम ठवकर (७०) रा. काटेब्राम्हणी, विलास अतकरी (३५) रा. टाकला, कमलाबाई नेवारे (६०), कलाबाई गभणे (५२), बबीता बावनकर (३८) रा. शिवनगर तुमसर अशी जखमींची नावे आहेत. तर तिघे किरकोळ जखमी आहेत. जिल्ह्यात सध्या रोवणीचे काम वेगात सुरु आहे. तालुक्यातील हसारा शिवारातील भैय्यालाल बघेले यांच्या शेतात रोवणीचे काम सुरु होते. १० ते १५ मजूर काम करीत होते. दुपारी १ वाजता च्या सुमारास अचानक पिसाळलेले रानडुकर शेतात शिरले. रानडुकराला पाहून सर्व मजूर पळू लागले. परतु वृध्द असलेल्या उत्तम ठवकर यांना पळता आले नाही. त्यामुळे रानडुकराने त्याला फरफटत नेले. हा प्रकार पाहून विलास अतकरी मदतीला धावून आला. मात्र, रानडुकराने त्याच्यावरही हल्ला केला. यानंतर झालेल्या आरडाओरडीने रानडुकर दुसऱ्या शेतात शिरला. त्याठिकाणी असलेल्या महिला मजुरांवर त्याने हल्ला केला यात कमलाबाईचा पायाला जब्बर चावा घेतला तर कलाबाईचा हात जखमी झाला. बबीताच्या कमरेला मार लागला. हा प्रकार पाहून एकच गोंधळ उडाला होता. यानंतर गावकºयांनी गंभीर जखमींना भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या उत्तम ठवकर व विलास अतकरी यांच्यावर भंडारा येथे उपचार सुरु आहे.
वनविभागाचे दुर्लक्ष
हसारा परिसरात गत काही दिवसांपासून रानडुकरांचा मुक्त संचार सुरु आहे. यामुळे मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला सुचना देवून रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. परंतु वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले आणि आज ही घटना घडली. सर्व जखमींना तात्काळ शासकीय मदत द्यावी अशी मागणी होत आहे.