जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:32 PM2018-10-02T21:32:24+5:302018-10-02T21:32:39+5:30

आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याला नवी दृष्टी, नवा अर्थ आणि आकार देणं, स्वत:चं विश्व व्यापक आणि समृद्ध करणं आपल्या हाती आहे. कारण कुटुंब आणि समाज यांनी बहाल केलेलं उपेक्षित आणि अपमानित जीवन जगण्यापेक्षा जीवनातले हे अखेरचे पर्व देशासाठी, गरीबांसाठी, लाचार आणि गरजूसाठी समर्पित करावे. वार्धक्क्यातही जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे व प्रेरक आदर्श नजरेसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमृत बंसोड यांनी केले.

The elders should take adverse changes | जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे

जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे

Next
ठळक मुद्देअमृत बंसोड : जेष्ठ नागरिक दिनानिमित्त भंडारा येथे सिनियर सिटिजनची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आयुष्याच्या संध्याकाळी जगण्याला नवी दृष्टी, नवा अर्थ आणि आकार देणं, स्वत:चं विश्व व्यापक आणि समृद्ध करणं आपल्या हाती आहे. कारण कुटुंब आणि समाज यांनी बहाल केलेलं उपेक्षित आणि अपमानित जीवन जगण्यापेक्षा जीवनातले हे अखेरचे पर्व देशासाठी, गरीबांसाठी, लाचार आणि गरजूसाठी समर्पित करावे. वार्धक्क्यातही जेष्ठांनी काळानुरूप बदल स्वीकारावे व प्रेरक आदर्श नजरेसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमृत बंसोड यांनी केले.
सिनियर सिटिजन्स मल्टिपरपज असोसिएशन भंडाराच्या वतीने आयोजित जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अमृत बन्सोड होते. याप्रसंगी इंजि. रूपचंद रामटेके, एम.डब्ल्यु. दहिवले, करण रामटेके, महेंद्र गडकरी, निर्मला गोस्वामी, महादेव मेश्राम आदींची उपस्थिती होती. यावेळी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यात निवृत्ती हा पूर्ण विराम नसून आयुष्यातला तो एक स्वप्नविराम आहे. अजुन बरेच आयुष्य बाकी असते. नव नवीन गोष्टी शिकण्याची, करून बघण्याची उत्स्तुकता मावळायला नको. काळ बदलला, कुटुंब व्यवस्था बदलली, कुटुंब मर्यादित झालं एक किंवा दोन अपत्य असणारे आई-वडिल वृद्ध झाले की, त्यांच्या समस्या वाढतात. यामुळे जेष्ठांनी काळानुरूप बदलाना सामोरे जाणे किंबहुना बदल हसत हसत स्विकारणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे उतारवयातील जेष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या नाहीशा होऊ शकतात, असे विचार व्यक्त केले.
संचालन गुलशन गजभिये यांनी केले. आभार आदिनाथ नागदेवे यांनी मानले. पुष्पा मेश्राम, सिमा बन्सोड यांचे सहकार्य लाभले.

Web Title: The elders should take adverse changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.